डॉ. नंदा हरम

सुगरणीचं घरटं पाहिल्यावर आपण आश्चर्यचकित होतो. एवढासा पक्षी इतक्या कुशलतेने हे घरटं कसं तयार करतो, याचं नवल वाटतं नाही? सुगरण पक्षी साधारण चिमणीएवढाच- म्हणजे अंदाजे १५ सेंमी असतो. दिसतोही साधारण तसाच. नर आणि मादी सुगरण दिसायला सारखेच असतात. मात्र प्रजननक्षम नरामध्ये बदल घडतात. चित्रात दाखविल्याप्रमाणे, त्याच्या डोक्याचा भाग भडक पिवळा, गडद तपकिरी अंग, तपकिरी- काळी चोच, छातीचा भाग पिवळा व त्याखालचा भाग थोडा फिकट बदामी रंगाचा असतो. हा पक्षी थव्यात राहणं पसंत करतो.

pune rain marathi news, pune unseasonal rain marathi news
पुण्यात हलकापाऊस; दुचाकी घसरण्याच्या घटना
loksatta analysis report on status of leopards in india
विश्लेषण : बिबटे वाढलेत… शेतात, गावच्या वेशीवर आणि सिमेंटच्या जंगलातही!
mhaisal yojana marathi news, mhaisal project sangli marathi news, mhaisal sangli jat taluka water issue marathi news
जतमध्ये पाण्यावरून राजकीय श्रेयवाद उफाळून आला
Danger from electric wires on footpaths Inexcusable negligence of the Municipal Corporation after entrusting the work to the contractors navi Mumbai
पदपथांवरील विद्युत तारांमुळे धोका; कंत्राटदारांकडे काम सोपवल्यावर महापालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष

सुगरणीचा प्रजननाचा काळ पावसाळा हा असतो. नर घरटं बांधतो. घरटं बांधताना हे पक्षी एके ठिकाणी २०-३० च्या संख्येत घरटं बांधतात. थोडक्यात, सहनिवास! जिथे अन्न-पाणी मुबलक असतं तसेच घरटे बांधण्याकरिता लागणारं साहित्यही सहज उपलब्ध असतं अशा जागेची निवड घरटं बांधण्याकरिता होते. गवत तसेच भाताच्या आणि पामच्या पानाच्या लांब पट्टय़ा तयार करून त्याचा वापर घरटय़ासाठी केला जातो. ही पट्टी साधारण २० ते ६० सेंमी लांबीची असते. संपूर्ण घरटं तयार करायला अशा ५०० पट्टय़ा नर तयार करतो. आहे की नाही कमाल! त्याच्या कष्टाला नसे पारावार!

नर आपल्या चोचीच्या साहाय्याने या पट्टय़ा तयार करतो आणि चित्रात दाखविल्याप्रमाणे सुंदर घरटं ‘विणतो.’ पाणथळ जागेजवळ असलेल्या झाडांना ही घरटी टांगलेली असतात. नराला हे घरटं पूर्ण करायला एकूण १८ दिवस लागतात, तर मधल्या स्थितीतील हेल्मेटच्या आकाराचं (चित्र पाहा) घरटं बनवायला ८ दिवस लागतात.

घरटं बांधणं चालू असताना नर घरटय़ात बसतो व पंख फडफडवून मादीला आकर्षति करून घेतो. मादी घरटय़ाची तपासणी करते. तिला पसंत पडलं तर तसं ती दर्शवते. एकदा त्यांची जोडी जमली की नर उरलेलं घरटं पूर्ण करतो. उरलेलं म्हणजे नळीसारख्या प्रवेशद्वाराचा भाग. घरटय़ाच्या आतल्या भागावर मादी शेवटचा हात फिरवते.

घरटय़ात अंडी घातली की मादी ती उबवायला सुरुवात करते, तर नर प्रवेशद्वाराच्या नळीचा भाग आणखी वाढवतो. प्रवेशद्वाराचा भाग तो थोडा सलसा ठेवतो. जणू काही कामं अर्धवट राहिल्यासारखं! हे तो मुद्दाम करतो; जेणेकरून भक्षकाला प्रवेशद्वारात नीट पाय रोवता येणार नाहीत.

या सर्व प्रक्रियेत वैशिष्टय़ असं की, मादीला घर आवडलं नाही तर नर ते घरटं अर्धवट सोडतो आणि नवीन ठिकाणी दुसरं घरटं बांधण्यास सुरुवात करतो. आधी वर्णन केल्याप्रमाणे तुमच्या लक्षात आलं असेल की किती कष्टाचं काम आहे! पण तो कचरत नाही. म्हणूनच उपरोक्त म्हण त्याला तंतोतंत लागू पडते. हो ना?

nandaharam2012@gmail.com