आयशा पाशु सय्यद

इयत्ता ७ वी, जि. प. बोरगाव काळे, ता. जि. लातूर</p>

एक छोटंसं गाव होतं. त्या गावात एक गरीब जोडपं राहत होतं. त्यांना दोन लेकरं होती. त्यांचं नाव- सुहाना अन् समीर. ते खूप लहान होते. माय-बाप लोकांच्या शेतातील सोयाबीन काढायचे आणि लेकरांचं पोट भरायचे.

एकदा अम्मी आजारी पडली अन् बापाचा पेवून पाय तुटलं. त्यामुळे त्यांच्या घरात पैसा आला नाही. पावसाळ्याचे दिस होते. पाऊस पडत होता. आता सुहाना व समीर शाळा सुटल्यावर घरी आले आणि म्हणाले,  ‘‘अम्मी, बेहद तेज भूख लगी है, जल्दी बताव क्या पकाया है?

अम्मी म्हणाली, ‘मेरी बच्ची, आज कुछ नही पका.’’ सुहानाने भोकाड पसरलं. समीर म्हणाला, ‘‘कामच नाही तो चुल्ला कैसा शिलगींगा.’’ सुहानाचे बाबा आले आणि म्हणाले, ‘‘क्या हुवा? युव क्यु मुॅँह बना रखा है.’’ सुहानी म्हणाली, ‘‘अब्बु बेहद तेज भूख लगी है.’’ सुहानाच्या बाबांना खूप वाईट वाटलं. त्यांचे डोळे पाणावले. सुहाना आणि समीर हुशार होते. त्यांनी ठरविलं की आता आपल्या घरात पैसे आणायचे.

दुसऱ्या दिवशी ते शाळेत जायचं म्हणून घरातून निघाले. कुठे निघाले माहीत आहे का तुम्हाला? ते गेले वाघ्याच्या शेतात! वाघ्या तिथं सीताफळ खात होता. सुहाना आणि समीर रात्रीचे उपाशी होते. त्यामुळे ते सिताफळाकडे टकामका बघू लागले. वाघ्या म्हणाला, ‘‘ए तू सम्या आहेस का?’’ समीर म्हणाला, ‘‘हो.’’  वाघ्या तू शाळेत का गेला नाहीस? वाघ्या म्हणाला, ‘‘शाळेत जाऊन काय दिवा लावायचाय!’’ सुहाना म्हणाली, ‘‘पढोगे लिखोगे तो बन जावोगे नवाब समझे.’’ तेवढय़ात वाघ्याचे बाबा आले. त्यांनी दोघांना एक-एक सिताफळ दिले. त्यांनी ते सीताफळ दप्तरात ठेवले व कामाला लागले.

दिवसभर काम करून दोघांचे हात रक्तरंगीले झाले होते. सहा वाजले. कामाला सुट्टी मिळाली. त्यांना पैसे मिळाले, पण कमी मिळाले. वीस-वीस रुपये. ते दोघे दुकानात गेले. थोडे तांदूळ आणले. चहापत्ती पुडा आणला व उरलेले पैसे अम्मीजवळ दिले. अम्मी म्हणाली, ‘‘एक मिनिट रुको! ये सब कहा से आया?’’ दोघे मान खाली घालून म्हणाले, ‘‘वो वो ना.. आम्मी आज हम काम को गये थे.’’ अम्मी म्हणाली, ‘‘क्या तुम्हे डाटू या प्यार करू, कुछ समज में नही आ रहा है.’’ बादलोसें बरसात नही तो अम्मीच्या डोळ्यातील बरसात होऊ लागली..

अनुवाद- अनिता जावळे-वाघमारे

balmaifal.lok@gmail.com