0018बराच काळ दडी मारलेल्या पावसाने हजेरी लावल्यामुळे सर्वानाच हायसे वाटले आहे. त्याचे स्वागत करण्यासाठी आज आपण अगदी पावसात नाही तरी पावसाबरोबर म्हणजेच Rain  या शब्दाशी खेळ खेळणार आहोत. ‘Rain या शब्दाने शेवट होणारे इंग्रजी शब्द तुम्हाला शोधायचे आहेत. त्यासाठी तुम्हाला सूचक माहितीही दिलेली आहे. चला पडूद्या Rain ने संपणाऱ्या शब्दांचा पाऊस.
सूचक माहिती : १) शरीराचे नियंत्रण करणारा अवयव २) वाहून जाणे ३) धान्य ४) आगगाडी ५) ताण ६) लचक, उसण ७) ध्रुवपद, परावृत्त करणे ८) भूप्रदेश ९) जनावरांचा एक रोग १०) खोल रुजवणे, भिनवणे ११) माल जप्त करणे १२) बंधन घालणे
उत्तरे :
1) Brain 2) Drain 3) Grain 4) Train 5) Strain 6) Sprain 7)Refrain 8) Terrain 9) Murrain 10) Engrain 11) Distrain 12)Constrain
 ज्योत्स्ना सुतवणी- jyotsna.sutavani@gmail.com

बिंदूजोडा
bl8rr