‘आजी, आईने झेंडूची खूप फुले आणली ना म्हणून मी आणि सानिकाने तोरण केलं दाराला लावायला. गाडीला घालायला मधे मधे आंब्याची पानेही घातली. कसं दिसतंय गं?’ रती आणि सानिकाचा उत्साह उतू जात होता. त्यांना खेळायला बोलावण्याच्या निमित्ताने सगळं मित्रमंडळ घरात दाखल झालेलं होतं. त्यामुळे या संधीचा मी लगेच फायदा उठवला.
‘‘छानच दिसतंय. ही झेंडूच्या केशरी पिवळ्या रंगाची किमया बरं का. आता कडक सोनेरी ऊन पडायला लागलं आहे. त्या उन्हाला मॅचिंग असा झेंडू, शेवंती या दिवसांत बहरून येतात. आपल्या पूर्वजांनी निसर्ग आणि सण यांची सुरेख सांगड घातली आहे. त्यामुळे नवरात्रात झेंडू, शेवंती यांचं मोठं माहात्म्य आहे. या भगव्या, केशरी रंगाचं वैशिष्टय़ माहीत आहे का तुम्हाला?’’
‘भगवा रंग म्हणजे पराक्रम, त्याग दर्शवितो.’ त्यातल्या त्यात जाणकार विराजने लगेच तलवार फिरवून ‘ढिश्यॅव, ढिश्यॅव’ची कृती करीत सांगून टाकलं. लुटुपुटुची लढाई तिथेच थांबवत मी माहितीची गाडी पुढे ढकलली.
‘‘खरं तर झेंडूचं फूल अतिशय सामान्य. त्याला नाजूक सौंदर्य किंवा दरवळणारा सुगंध नाही, पण त्याचा उठून दिसणारा रंग आणि टिकाऊपणा वादातीतच. हे  माळी, फुलवाले त्यांना भराभर हाताळतात, पण त्याचा गोल गरगरीत आकार तसाच राहतो.’’
‘‘आजी मी दसऱ्याची गोष्ट सांगते, मला आठवतेय तू सांगितलेली.’’ गोष्ट म्हटल्यावर सगळ्या बालगोपाळांनी कान टवकारले. ‘जगन्माता पार्वतीने नऊ दिवस महिषासुराबरोबर युद्ध करून दहाव्या दिवशी त्याला ठार मारून विजय मिळविला. त्या वेळी तिने ‘विजया’ नाव धारण केले म्हणून ही विजयादशमी.’ -इति रती.
‘याच दिवशी प्रभुरामचंद्रांनी रावणाची दहा शिरे हरण करून विजय मिळविला म्हणून हा दशहरा किंवा दसरा, हो की नाही आजी,’ सानिकाने ‘हम भी कुछ कम नही’ या थाटात पुस्ती जोडली.
‘पराक्रम, त्याग, विजय याच्याशी भगव्या रंगाचं नातं असल्यामुळे नवरात्रात स्त्री-शक्तीच्या पूजेत आणि दसऱ्याला झेंडूला मानाचं स्थान मिळालं आहे. देवीला नऊ दिवस झेंडूची माळ बांधून आणि दसऱ्याला झेंडूचं तोरण लावून आपण या विजयाचं सेलिब्रेशन करतो, नाही का!’
‘आजी, तू ओटी भरायला देवळात जातेस तेव्हा शेवंतीची वेणी घेतेसच ना गं,’ ओटी भरायला बरोबर आल्यामुळे रतीला आठवण झाली.
‘हो, झेंडूचं फूल उभट, झालरीदार कडांच्या इवल्या-इवल्या असंख्य पाकळ्यांनी बनलेलं, तर पिवळ्या, पांढऱ्या सौम्य रंगाच्या शेवंतीचं फूल पसरट, पंखासारख्या अगणित पाकळ्यांनी तयार झालेलं. शेवंतीची कलाबूत, गुलबक्षी हिरवे लोकरीचे तुकडे अडकवून केलेली वेणी जड असली तरी देवीला प्रिय. ओटीच्या साहित्यात ती नारळावर कशी ठेवलेली असते, पाहिलंत ना, नसेल पाहिलं तर आज मुद्दाम बघून या. गेलात की एखादं खेळणंही आई घेऊन देईल तिथल्या विक्रेत्यांकडून.’
तेवढय़ात स्वत:तच रमलेल्या आराध्यने गुपचूप झेंडूचं फूल कुस्करल्यामुळे अनायसे सगळ्यांना पाकळ्या बघायला मिळाल्या.
‘या सगळ्या पाकळ्या गोळा करून ठेवा, दुपारी आपल्याला फुलांची रांगोळी काढता येईल. झेंडू आणि शेवंतीशिवाय ही रांगोळी चांगली दिसणारच नाही.’
‘आजी, आम्ही सोनं वाटायला जाणार आहोत संध्याकाळी, त्या वेळी नवीन परकरपोलका घालणार आहे मी,’ सानिकाला त्याचे वेध लागले होते. सगळ्या छोटय़ा कंपनीने ‘आम्हीसुद्धा ऽऽ आम्हीपण’ करीत री ओढली.
‘जरा इकडे लक्ष द्या. सोनं म्हणून आपण जी आपटय़ाची पानं लुटतो त्याची दोन पानं चिकटल्यासारखी असतात, जणू जोड पाने. बॉहिनिया रासिमोटा हे त्याचं शास्त्रीय नाव. जॉन आणि गॅस्पर्ड बॉहिन या जुळ्या वनस्पतिशास्त्रज्ञांच्या स्मरणार्थ त्यांचं नाव या वृक्षाला दिलं आहे. पानं हातात घेतली की जाणवतं फार कडक आहे, फांदीपासून पटकन् तुटत नाही. सोनं वाटण्याच्या निमित्ताने नैसर्गिक पानगळ घडत असेल का? विचार करा. अर्थात अति सर्वत्र वज्र्ययेत, हा नियम पाळायलाच हवा. आपटय़ाबरोबरच दसऱ्याला शमीचंही महत्त्व आहे. गणपतीला शमी आणली होती तेव्हाची गंमत आठवते का रती?’

‘होऽऽ, किती वेळेला मला काटे टोचले, हाय हाय करत होते मी, अगदी डोळ्यांतून पाणी आलं शेवटी,’ रती.

Olya Sodyachya Vadya Recipe In Marathi
ओल्या सोड्याचे कटलेट; संध्याकाळच्या नाश्त्यासाठी सोपी रेसिपी, मुलंही आवडीनं खातील
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
Viral video: Man vomits live worm after complaining of abdominal pain
VIDEO: पोटात दुखतेय म्हणून खाल्लं किडे मारायचं औषध; दुसऱ्या दिवशी व्यक्तीच्या पोटातून बाहेर आली धक्कादायक गोष्ट
Bhandara Special Aloo Tamatar Rasa Bhaji Recipe
भंडाऱ्यातली बटाटा भाजी चवीला एकदम स्पेशल.. भंडारा स्पेशल भाजीची घ्या झणझणीत रेसिपी

मध्यम उंचीच्या, मजबूत अशा शमी वृक्षाच्या खोडावर, फांद्यांवर टोकदार काटेच काटे असतात. पाने संयुक्त आणि जोडीत. जोडीतील प्रत्येक संयुक्त पानावर आठ ते बारा उपपाने असतात. संयुक्त पानाची लांबी साधारण दीड-दोन इंच असते. उपपाने अगदी ‘चिंटू’ असतात आणि पटकन गळून पडतात. किती फरक आहे ना दोन्ही पानांत! दसऱ्याच्या निमित्ताने दरवर्षी ही पानं तुम्हाला बघायला मिळावीत, त्यासाठी या दुर्मीळ वृक्षांची लागवड करायला हवी, त्यांचं जतन आणि संवर्धन करायला हवं, हा खरा हेतू. शिवाय आपल्या परिसरातील वृक्षांची पाने बघायचा मोह तुम्हाला पडला तर चांगलंच.’
आणलेल्या आपटय़ाची पानं खुडून ठेवण्याचं काम अगदी उत्साहात पार पडलं.
‘बरं का मुलांनो, आमच्या लहानपणी दसरा म्हटलं की, प्राथमिक शाळेत सरस्वतीपूजन असायचं. आता पाटी हरवून गेली, पण कागद आहेत ना प्रत्येकाकडे. मग आजच्या सुमुहूर्तावर सरस्वतीचं चित्र काढा, कशी वाटते कल्पना!’