News Flash

गुरुत्वमध्य

एखादी वस्तू आपण हाताळतो तेव्हा नकळत त्या वस्तूचा गुरुत्वमध्य कोठे असावा याचा अंदाजही घेत असतो.

| April 21, 2013 12:04 pm

एखादी वस्तू आपण हाताळतो तेव्हा नकळत त्या वस्तूचा गुरुत्वमध्य कोठे असावा याचा अंदाजही घेत असतो.

 

 छायाचित्र १ पाहा. येथे एका जाड लाकडी फळीला एका बाजूला थोडे तिरके असे गोल भोक पाडलेले आहे. या फळीचा गुरुत्वमध्य दोन बोटांच्या मधोमध आहे.

 

आता छायाचित्र २ पाहा. यात एक काचेची बाटली दोन बोटांमध्ये समतोलात आडवी पकडली आहे. बाटलीचा गुरुत्वमध्य दोन बोटांच्या मधोमध (बाटलीच्या आतमध्ये) हवेत आहे.

 

 

छायाचित्र क्र. ३ मध्ये लाकडी फळीतील भोकात बाटली अडकवून फळी टेबलवर उभी केली आहे. बाटली हवेत आडवी राहते म्हणून काही लोकांना संशय येतो की फळीचा तळ खाली घट्ट चिकटवला असावा, पण तसे बिलकूल नाही. यामागील विज्ञान असे आहे. लाकडी फळी व बाटली या संयुक्त वस्तूचा गुरुत्वमध्य आकृती १ मध्ये दाखविल्याप्रमाणे दोन्ही वस्तूंचे गुरुत्वमध्य सांधणाऱ्या रेषाखंडावर हवेत असतो. त्याचे स्थान या दोन वस्तूंच्या वजनांवर ठरते. परंतु अंदाज येण्यासाठी कल्पना करा की दोन्ही वस्तूंचे वजन समान आहे. अशा परिस्थितीत संयुक्त वस्तूचा गुरुत्वमध्य या रेषाखंडाच्या मध्यावर असेल. या िबदूतून काढलेली ओळंब्याची रेषा (ढ’४ेु ’्रल्ली) जर पायामध्ये पडत असेल तर वस्तू समतोलात राहते.

छायाचित्र ४ मध्ये तीच बाटली दुसऱ्या एका पातळ लाकडी फळीच्या आधाराने हवेत आडवी ठेवली आहे. नीट निरीक्षण केल्यास सहज समजेल की लाकडी फळीचे वजन कमी असल्याने ती जास्त तिरकी ठेवावी लागली.

 

 

छायाचित्र ५ मध्ये बाटली खूपच हलकी (प्लास्टिकची) असल्याने फळी जवळजवळ उभी वाटते.

 

 

 

छायाचित्र ६ मध्ये एका काचेच्या पेल्यात थोडे पाणी घेऊन पेला एका िबदूवर तिरका उभा केला आहे. यामागचे रहस्य असे की पेल्याच्या तळाशी चिमूटभर (अगदी थोडेसे) मीठ ठेवून त्या मिठावर पेला तिरका उभा करता येतो. यासाठी अतिशय हळुवारपणे समतोल साधावा लागतो. प्रयत्न करून पाहा!

 

यापेक्षा सोपा प्रयोग छायाचित्र ७ मध्ये आहे. येथे एका स्टेनलेस स्टीलच्या लोटीमध्ये थोडेसे पाणी घेऊन ती लोटी चिमटीभर मिठावर तिरकी उभी केली आहे. मिठाचे स्फटिक समतोल साधायला मदत करतात.

छायाचित्र ८ मध्ये नाणी एकावर एक पण तिरकी रचली आहेत. गुरुत्वमध्यातून काढलेली ओळंब्याची रेषा पायाच्या आत पडत असल्याने हा झुकता मनोरा आपला तोल सांभाळून आहे. आणखी नाणे ठेवून तिरकी उंची वाढवायचा प्रयत्न केला तर मनोरा कोसळतो.

छायाचित्र ९ मध्ये असाच मनोरा आहे, पण वरची नाणी मागच्या बाजूला सरकवली आहेत.

छायाचित्र १० मध्ये भारतीय नाण्यांचा ड्रॅगॉन बघून तुमच्या मनात येईल की नाणी एकमेकांना  चिकटवायच्या पदार्थाने घट्ट चिकटवली आहेत. पण तुमचा अंदाज चुकला! येथे कोणताही चिकटवायचा पदार्थ वापरलेला नाही. या प्रयोगामागील रहस्य व विज्ञान पुढील भागात. 

(पूर्वार्ध)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2013 12:04 pm

Web Title: centre of gravity
Next Stories
1 डोकॅलिटी
2 आर्ट गॅलरी
3 भोपळ्याच्या बियांचा लाडू
Just Now!
X