साहित्य : जुनी बटणे, मणी, लोकरीची फुलं, दोरे, सॅटिन पट्टय़ा, कागदी रंगीत पट्टय़ा, ग्लिटर्स, सुई-दोरा, ब्रश इ.
कृती : छायाचित्रात दाखविल्याप्रमाणे १/२ इंचाच्या सॅटिनच्या साधारण १/२ मीटर पट्टीच्या मधोमध विरुद्ध रंगाच्या सुई-दोऱ्याने बटणे शिवून घ्या. बाजूला कागदी पट्टय़ांचे मणी ओवा, त्यामुळे सॅटिनवरून बटणे हलणार नाहीत व वजन पेलण्यास मदत होईल. एकच लोकरीचे फूल असल्यास ते मधोमध घ्या व बाजूला उभट लंबगोल मणी ओवा व बाजूने गाठी मारून त्यांना मध्यावरच बांधून घ्या. तुमच्या कल्पक डोक्यातून राख्यांचे इतरही काही वेगवेगळे प्रकार निरनिराळ्या साहित्याने व रंगसंगतीने बनवता येतील. पाच मिनिटांत बनणारी ही पर्यावरणस्नेही राखी बनवून खूप मज्जा येईल व अपल्याकडील खजिन्याचा योग्य उपयोगदेखील होईल.