करोनाचा राक्षस आला आपल्या दारी
बसूया घरी, नाहीतर पडेल तो भारी
घरीच बनवून लावूया तोंडाला मास्क
आईनी दिलेलं पुरं करू टास्क
सोसायटीतलं अंगणही झालं चिडीचूप
बागेतल्या झोपाळ्याला लागले ना कुलूप
नको गेम मोबाईलचा, नको ते कार्टून
गोष्टी छान वाचून, काढू चित्र रंगवून
आईचं घरकाम कधी संपतच नाही
बाबांना ऑफिसकाम घरबसल्याही
थोडा झाडू मारू, खोली लख्ख आवरू
आपलं आपण जेवून, ताट साफ करू
परीक्षा ना शाळेची, पण करू गृहपाठ
आई-बाबा ‘शाबास’ म्हणत थोपटतील पाठ
ठाण मांडून बसला हा करोना व्हायरस
कधी मिळणार चापायला पुरेसा आमरस
– श्रीपाद पु. कुलकर्णी
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 12, 2020 12:05 am