13 December 2017

News Flash

जलपरीच्या राज्यात : गर्द काळोखाच्या पोटी

समुद्रतळातील भेगा-खाचांमधून समुद्राचं खारं पाणी झिरपून समुद्रतळाखालील खोल तप्त खडकांपर्यंत पोहोचतं.

ऋषिकेश चव्हाण | Updated: April 16, 2017 1:14 AM

लॅण्टर्न फिश

आजच्या लेखामध्ये आपण कन्व्हेअर बेल्टवर स्वार होऊन खोल खोल समुद्रामध्ये बुडी मारणार आहोत. अथांग खोल समुद्र ही आपल्या पृथ्वीवर आढळणारी सर्वात मोठी परिसंस्था आहे. आपल्या ग्रहावर पसरलेल्या सागरापैकी तब्बल ८०% भाग या परिसंस्थेने व्यापलेला आहे. सागराच्या पोटामध्ये खोल पाण्यात अंधाराचंच साम्राज्य असतं. सूर्यप्रकाश इथपर्यंत पोहोचतच नाही. काही मोजक्या जागा सोडल्या तर खोल समुद्रात तापमान थंड, २-४ डिग्री सेल्सिअस दरम्यान असतं. इथे अन्नदेखील मोजकंच असतं. इथलं अन्न प्रामुख्याने सेंद्रिय द्रव्यांच्या सूक्ष्म कणांच्या रूपात असतं.

या अशा अंधाऱ्या, कमी अन्नाच्या प्रदेशातही या परिस्थितीशी अनुकूल जीवन बहरतं. इथे आढळणाऱ्या कित्येक माशांमध्ये प्रकाशनिर्मिती करणारे अवयव आढळून येतात. उदाहरणार्थ, लॅण्टर्न फिश. इथल्या काही माशांमध्ये अन्न मिळवण्याकरिता अनोखी उत्क्रांती झालेली आढळते. यांचे काही विशिष्ट अवयव भक्ष्याला घाबरवण्याकरिता, फसवून आकर्षून घेण्याकरिता खास विकसित झालेले असतात. आपण मासे पकडण्याकरिता वापरतो त्या गळासदृश एक लांब अवयव अ‍ॅंगलर फिशच्या दोन डोळ्यांदरम्यान असतो. या लांब अवयवाकडे भक्ष्य आकर्षित होतं आणि अ‍ॅंगलर फिश त्यावर ताव मारतात. काही प्रजातींमध्ये अनोखे स्वयंप्रकाशित अवयव असतात- जे भक्ष्याला आकर्षित करतात.

समुद्रतळातील भेगा-खाचांमधून समुद्राचं खारं पाणी झिरपून समुद्रतळाखालील खोल तप्त खडकांपर्यंत पोहोचतं. भूगर्भातील तापलेले खडक आणि पाण्यामधल्या रासायनिक प्रक्रियेमधून अतिशय उष्ण आम्लीय द्रव तयार होतो, ज्यामुळे खोल समुद्रामध्ये काही ठिकाणी उष्ण पाण्याचे निष्कास किंवा उष्ण पाण्याची निमुळती क्षेत्रं तयार होतात. या अनोख्या वातावरणामध्येदेखील काही वैशिष्टय़पूर्ण जीव जगतात. जायंट टय़ूब वम्र्स याच अनोख्या वातावरणामध्ये आढळतात.

ऋषिकेश चव्हाण – rushikesh@wctindia.org

शब्दांकन : श्रीपाद

First Published on April 16, 2017 1:14 am

Web Title: different species of lanternfishes in the deep sea