बालमित्रांनो, आजचे कोडे मराठी भाषेतील काही विशेष विशेषणांवर आधारित आहे.  तुम्हाला आढळेल की क्रियापदांवर आधारलेली ही विशेषणे बहुतांश वेळा एका विशिष्ट शब्दासाठी वापरली जातात. उदाहरणार्थ ‘फेंदारलेले नाक’. जणू काही फेंदारलेले हे विशेषण नाकासाठीच राखीव आहे.
अशाच काही विशेषणांची यादी खाली दिलेली आहे. ही विशेषणे कुठल्या शब्दांसाठी वापरली जातात ते तुम्ही ओळखायचे आहे. थोडा विचार करून ही यादी पुढेही वाढवता येईल. मित्रमत्रिणींना सहभागी करून तुम्ही हा खेळ खेळू शकता.