News Flash

डोकॅलिटी

दोस्तांनो, तुम्ही शब्दकोडे पाहिले असेल किंवा सोडवलेही असेल. आज असेच एक गणिताचे कोडे तुम्हाला सोडवायचे आहे.

दोस्तांनो, तुम्ही शब्दकोडे पाहिले असेल किंवा सोडवलेही असेल. आज असेच एक गणिताचे कोडे तुम्हाला सोडवायचे आहे. ते सोडवण्यासाठी तुम्हाला सूचक माहिती दिलेली आहे. त्यावरून तुम्हाला योग्य आकडा शोधायचा आहे. परंतु चौकटीत लिहिताना त्याचा रोमन अंक लिहायचा आहे. उदाहरणार्थ, कोळी या प्राण्याला — पाय असतात. याचे उत्तर तुम्हाला माहीतच आहे- आठ हा आकडा रोमनमध्ये  असा लिहितात. जो तुम्हाला चौकटीत श्ककक अशा प्रकारे लिहायचा आहे. चला तर करू या सुरुवात!
सूचक माहिती- आडवे
१) ३ गुणिले ३ गुणिले २
४) सर्वात छोटी मूळ संख्या
५) समजा, घडय़ाळात साडेबारा वाजले आहेत. म्हणजेच घडय़ाळाचा मोठा काटा (मिनिट काटा) या अंकावर आहे.
७) सर्वात लहान दोन आकडी मूळ संख्या
८) एका आठवडय़ाचे दिवस
९) सर्वात लहान चार आकडी संख्या
१०) माझ्याजवळ २० रुपयांच्या ५ नोटा आहेत म्हणजे माझ्याजवळ एकूण—-रुपये आहेत.
११) —–ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले.

सूचक माहिती- उभे
१) माझ्याजवळ असलेल्या २८ चॉकलेट्सपैकी प्रत्येकी ७ प्रमाणे माझ्या दोन भावंडांमध्ये वाटली, तर आता माझ्याजवळ किती चॉकलेट्स असली पाहिजेत?
२) ३ चा वर्ग
३) पहिली विषम मूळ संख्या
६) १६ चे वर्गमूळ
७) (८ गुणिले ३) –
(१५ भागिले ३)
manaliranade84@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 4, 2015 1:01 am

Web Title: docality 5
टॅग : Docality
Next Stories
1 सार्थक
2 फुलपाखरा
3 गंमत कोडी
Just Now!
X