श्रीनिवास बाळकृष्णन

दिवाळीच्या सुटीत भरपूर मजामस्ती आणि आळस केल्यानंतर ‘कार्टूनगाथा’मध्येही असंच काहीतरी हवं, असं चिक्कार मुलांनी पत्र पाठवून सांगितलं. त्यानुसार आजचं कार्टून भलतंच भन्नाट निवडलं आहे. तुम्ही गेस करा.. मी हिंट देतो.

Loksatta kalakaran Architecture heritage and reality
कलाकारण: वास्तुरचना, वारसा आणि वास्तव!
Loksatta kutuhal Creator of artificial intelligence Judea Perl
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेचे रचनाकार – ज्युडेया पर्ल
ग्रामविकासाची कहाणी
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…

हे असं कार्टून आहे की ते पाहून आपली मुलं बिघडतील, असे दोन परस्पर शत्रू असणाऱ्या पाकिस्तान आणि भारतीय पालकांना वाटतं. ओळखलंत?

कोचिकामे?

शिनचॅन?

छँ!, चूक!

हे होतं डोरेमॉन कार्टून!

होय डोरेमॉन! तेच कार्टून- जे चांगल्या गोष्टी, संस्कार विनोदी मार्गाने दाखविण्याचा प्रयत्न करतं. पण भारतातल्या आणि पाकिस्तानातल्या काही पालकांना अजिबात कळत नाही. इतकंच नाही, तर याच खऱ्या पालकांप्रमाणे कार्टूनमधल्या पालकांनाही वाटतं की, आपल्या मुलांवर चांगले संस्कार घडावेत. हे संस्कार चांगलं वाचून, ऐकूनच वगैरे येतात, असंही त्यांना वाटतं.

नक्की तसं होतं काय? चला तपासू या.

हे कार्टून घडतं जपानमधील एका छोटय़ा शहरात. कथा मुख्य पात्र नोबिता- नोबी याच्याभोवती फिरते. आळशीपणा, लोभ, हाव हे सामान्य गुण आहेतच, पण कष्ट न करता सर्व काही मिळवण्याची स्वप्नं पाहणारा शेखचिल्ली असा नोबिता. मध्यमवर्गीय असणारे कुटुंब! याचे वडील कुठेतरी नोकरीला आहेत, तर आई घरीच असते.

नोबिताचा शाळेतला शत्रू-मित्र म्हणजे टेकशी गोडा (टोपणनाव ‘जियान’) नामक जाडजूड मल्ल कम् खेळाडू- जो (भसाडा आवाज असणारा) गायक बनू इच्छितोय. शक्तीच्या जोरावर सर्व काही घेऊ पाहणारा. त्याची छोटी बहीण कॉमिक पुस्तक काढू इच्छितेय. यांची आई भाजीपाल्याचा व्यवसाय सांभाळते. फटके देऊन मुले वठणीवर येतात असा तिचा समज. तर सुनेयो होनकावा (सुनियो) हा प्रचंड श्रीमंत व तितकाच गर्वष्ठि मुलगा. बाबा बाहेरील देशात नोकरीला असल्याने त्याला कशाचीच कमी नाही. आईही त्यासारखीच. पशापुढे काहीच नाही.

सुझुका ही संगीत, नृत्य आणि अभ्यासात हुशार असणारी आहे. हे घर पालकत्व जाणलेलं म्हणावं असं. त्यामुळे अभ्यासात व चित्रकलेत हुशार असणाऱ्या डेगीसुगीसारखे मित्र यांना जास्त आवडतात, पण बाकीच्यांनाही ना नसते. तर या नोबीताचे सुझुकावर एकतर्फी प्रेम!

(पुढे भविष्यात यांचं लग्न होतं आणि त्यांना एक मुलगाही असतो. त्याचे नाव नोबिसुके नोबी. पण ते पुढे!)

हे सर्व श्रीमंती, हुशारीने वेगळे असले तरी भारतात नसल्याने एकाच तुकडीत असतात. आणि पालकांना त्याचे काही वाटत नाही. ‘कुठेही केव्हाही झोप घेऊ शकतो’ या एका गुणाव्यतिरिक्त नोबिताकडे या सर्वासारखे काहीच नसते. असे नसल्याने म्हणा, याचे जगणं सुस करायला डोरेमॉन नावाचा एक २१व्या शतकातील रोबो बोक्याला ‘सेवाशी नोबीकडून’ या शतकात पाठवलं जातं. त्याला कांगारूला असते तशी पोटाला गॅजेट्सची पिशवी आहे. त्यातून अनोखे अचाट गॅजेट्स निघतात. जे पुढे नीट न वापरल्याने किंवा वापरण्यामागचा हेतू चांगला नसल्याने अनेक प्रकरणं नोबिताच्या अंगाशी येतात. हा गोंधळ संपवायला पुढे डोरेमॉनलाच यावं लागतं. या डोरेमॉन का दिल ‘दर्या’ असल्याने तो अनेक चुका करणाऱ्या नोबिताला मदत करतच राहतो.

(कथा जपानची असल्याने रोबो बोका, अरबी असता तर दिव्यातला बोका राक्षस अन् भारतीय असता तर डोरेमॉन नावाचा बोका परी वगैरे असता. ह्यॅ ह्यॅ ह्यॅ  !! )

हा रोबो डोरेमॉनदेखील माणसासारखाच आहे. डोरेमी नावाची त्याची २१व्या शतकातील मत्रीण आहे. तरीही इतर मांजरी त्याच्या मत्रिणी आहेतच.. टिपिकल बोका.  बोका असूनही त्याला उंदराची भीती वाटते. तर त्याला डोनट खायला खूप आवडतात. नोबिता खूपदा डोनटचं आमिष किंवा उंदराची भीती दाखवून हवं ते काम काढून घेतो. हे तो कोणाकडून शिकला देव जाणे! आपण कित्ती बिचारे आहोत हे दाखवण्यात त्याचा हात तुम्हीही नाही धरू शकत.

अशी ही भन्नाट थीम असलेली मालिका म्हणजे आधुनिकतेचा व अति आधुनिकतेचा संगम आहे. यातील एकेक अचाट कल्पना म्हणजे नव्या गॅजेट्सची ब्लु प्रिन्टं आहे. आज २१ वे शतक असल्याने आपण त्या पाहू शकतो. पण याची कल्पना मात्र फारच आधी केली गेली.

जपानमध्ये हे कार्टून मांगा कॉमिक पुस्तकात १९७० ला प्रकाशित झालं. फुजिको फुजिओ हे त्याचे लेखक. हिरोशी फुजिमोटो हे रेखाचित्रकार (इलस्ट्रेटर). या सर्व भागाचे वर्णन विनोदी सायन्स फिक्शन असे त्याचे करता येईल.

पुस्तकात एकूण १३४५ कथा होत्या. या पुस्तकाच्या १०० दशलक्ष प्रती जगभरात विकल्या गेल्या. भारतात हिंदी, तेलगू, तामिळमध्ये भाषांतर करून ही पुस्तकं आली.

२००८ वर्षी जपान मंत्रालयाने डोरेमॉनला सांस्कृतिक चिन्ह म्हणून घोषित केले. इतर देशातील लोकांनी जपानी संस्कृती समजून घेण्यासाठी या पुस्तकाचा वापर करावा, असे स्पष्टीकरण तिथल्या मंत्रालयाने दिले. ‘टाइम एशिया’ मासिकाने डोरेमोनला ‘एशियन हिरो’ ही उपाधी दिली.

अ‍ॅनिमेशन सुरू झालं ते १९७३ ला. त्याचे १७८७ भाग प्रसारित झाले. २००४-५ साली ते भारतात आलं. इथं याच काळात मॉल, मोबाईल, आधुनिक संगणक, प्रिन्टं यांसारख्या गोष्टी येत गेल्या. बांगलादेश आणि भूतान सरकारने- डिस्ने कंपनीने हे कार्टून केवळ ‘हिंदीत’ लादलंय म्हणून बंदी आणली. त्यांना त्यांच्या भाषेत कार्टून हवं. आपल्याला मात्र मराठीत कार्टून असावं असं वाटतदेखील नाही. असो.

मुलं संस्कार शिकत असतात ते आपल्या आईवडिलांकडून! त्यानंतर नंबर लागतो तो आजूबाजूच्या परिसरातून, शाळेतून आणि सर्वात शेवटी सिनेमा, टीव्ही मालिका, भजन- कीर्तनातून! कार्टून पाहून कोणी असंस्कारी झाल्याचे माझ्या तरी पाहण्यात नाही.

या कार्टुनमधील प्रत्येक बालक हा त्या पालकांची कॉपी वाटावी अशी आहेत. एक पाऊल पुढेच म्हणा ना! खऱ्या जीवनातही असंच असतं का?

हे कार्टून खरं तर पालकांनीच पाहावं. आपण मुलांना वाढवताना काय चुका करतो हे कार्टूनमधल्या पालकांना पाहून शिकता येईल. आणि नेमकं कसं शिकवावं याचं भान ‘डोरेमॉन’ला पाहून येईल.

chitrapatang@gmail.com