X
X

क्षेत्रफळ काढा

READ IN APP

सोबतचा नकाशा एका ८ ७ ८ चौरसाकृती बागेचा आहे. यातील निळा भाग हा हौद असून त्यात कारंजी लावलेली आहेत. हिरव्या भागात लोकांना बसण्यासाठी हिरवळ तयार केली आहे. आणि पिवळ्या भागामध्ये लहान मुलांसाठी घसरगुंडी, सी-सॉ, झोपाळे आहेत. चित्रात दिलेल्या मापांनुसार तुम्हाला …

सोबतचा नकाशा एका ८ ७ ८ चौरसाकृती बागेचा आहे. यातील निळा भाग हा हौद असून त्यात कारंजी लावलेली आहेत. हिरव्या भागात लोकांना बसण्यासाठी हिरवळ तयार केली आहे. आणि पिवळ्या भागामध्ये लहान मुलांसाठी घसरगुंडी, सी-सॉ, झोपाळे आहेत.

चित्रात दिलेल्या मापांनुसार तुम्हाला निळ्या, पिवळ्या, हिरव्या भागांचे एकूण क्षेत्रफळ काढायचे आहे.

(टीप:- नकाशातील मापे सोईसाठी योग्य प्रमाणात कमी करून घेतली आहेत.)

सोडवण्याची पद्धत आणि उत्तरे :

१) निळ्या भागाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी त्याचे तीन आयताकृती भाग करून घ्या. निळ्या भागाचे एकूण क्षेत्रफळ = लांबी ७ रुंदी हे सूत्र वापरून २८ हे उत्तर येते.

२) आपल्या आकृतीत चार काटकोन त्रिकोणाकृती पिवळे भाग आहेत.

एका त्रिकाणाचे क्षेत्रफळ =  ½  पाया x उंची हे सूत्र वापरून ३ असे मिळेल. म्हणजेच पिवळ्या भागाचे एकूण क्षेत्रफळ = ३ x  ४ = १२ असे येईल.

३) आकृतीतील हिरवा भाग म्हणजे चार समलंब चौकोन आहेत.

समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ = ½ (a+b) x उंची या सूत्राने मिळते.  यात a=1, b=3 आणि उंची = ३ घेतल्यास ६ उत्तर मिळते. म्हणजेच हिरव्या भागाचे एकूण क्षेत्रफळ = ६ x  ४ = २४ येईल.

जर तुम्हाला समलंब चौकोनाच्या क्षेत्रफळाचे सूत्र आठवत नसेल तर हिरव्या भागाचे एकूण क्षेत्रफळ आणखी एका सोप्या पद्धतीने काढता येईल. हिरव्या भागाचे एकूण क्षेत्रफळ म्हणजे संपूर्ण बागेच्या क्षेत्रफळातून निळ्या आणि पिवळ्या भागाचे क्षेत्रफळ वजा करायचे.

म्हणून हिरवा भाग एकूण क्षेत्रफळ = ६४ – २८ -१२= २४.

23

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

  • Tags: balmaifil,
  • Just Now!
    X