साहित्य : ओरीगामी पेपर वा आवडत्या रंगांचे कार्ड पेपर, गम, कात्री, पेन्सिल, रबर, सजावटीचे साहित्य.

कृती- सर्वप्रथम ओरिगामी पेपर घेऊन त्याचे अनुक्रमे २० से. मी, १८ सें. मी., १५ सें. मी., १२ सें. मी., ८ सें. मी., ५ सें. मी. आकाराचे चौरस कापून घ्या. प्रत्येक चौरसाचा चौफुला बनवून घ्या. तयार झालेले चौफुले एकावर एक पिरॅमिडप्रमाणे चिकटवा. ४ बाय २० सें. मी लांबीचा कार्डपेपर घेऊन त्याची गुंडाळी करून घ्या. ती गुंडाळी चौफुल्यांच्या पिरॅमिडखाली चिकटवा व सजवा. झाला तुमचा ख्रिसमस ट्री तयार!

चौफुला

एक चौरस पेपर घ्या. त्याचा मध्यबिंदू काढा. त्या मध्यबिंदूवर चौरसाची चारही टोके जुळवून घ्या.

चौरसाची घडी उलटी करून तीच क्रिया अजून दोन वेळा करा. घडी उलटा. झाला तुमचा चौफुला तयार.

गौरी केतकर