20 January 2019

News Flash

डोकॅलिटी

टेनिसप्रमाणेच हा खेळ एकेरी, दुहेरी, मिश्र दुहेरी या प्रकारात खेळला जातो.

जगभरात फुटबॉलनंतर आणि भारतात क्रिकेटनंतर सर्वात लोकप्रिय खेळ कोणता आहे असे तुम्हाला वाटते? बरोबर. बॅडमिंटन. या खेळाला पूर्वी शटलकॉक आणि बॅटलडोर असे नाव होते. भारतात या खेळाला ‘पूना’ असे नाव होते, कारण तो खेळ ब्रिटिश राजवटीत पुण्याला लष्करी छावणीमध्ये मोठय़ा प्रमाणात खेळला जात असे.

टेनिसप्रमाणेच हा खेळ एकेरी, दुहेरी, मिश्र दुहेरी या प्रकारात खेळला जातो. या खेळात मानाची समजली जाणारी ऑल इंग्लंड चँपियनशिप १९०० सालापासून खेळली जाते. समर ऑलिम्पिकमध्ये या खेळाचा समावेश १९९२ साली बार्सिलोना येथे भरलेल्या ऑलिम्पिक खेळांपासून केला गेला आहे.

१९८० साली ऑल इंग्लंड स्पर्धा भारताच्या प्रकाश पदुकोन यांनी जिंकली व त्याच वर्षी जागतिक क्रमवारीत त्यांना पहिला क्रमांक मिळाला. २००१ साली हीच स्पर्धा जिंकणारे गोपीचंद हे दुसरे भारतीय ठरले. पुढे गोपीचंद यांनी सुरू केलेल्या अ‍ॅकॅडमीत शिकलेल्या सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू या दोघी ऑलिम्पिक पदाच्या मानकरी ठरल्या आहेत. तसेच श्रीकांत कदंबी या खेळाडूने यावर्षी मानाच्या अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत.

१) बॅडमिंटनच्या शटलकॉकमधील पिसांची संख्या किती?

अ) १० ब) १२ क) १६ ड) १८

२) बॅडमिंटनच्या खेळातील नेट जमिनीपासून किती फूट उंचीवर असते?

अ) ३ ब) ५ क) ४ ड) ६

३) खालीलपैकी रॅकेटने खेळला जाणारा सर्वात वेगवान खेळ कोणता?

अ) टेनिस ब) टेबल टेनिस क) स्क्वॉश ड) बॅडमिंटन

४) रिओ ऑलिम्पिक २०१६ मध्ये बॅडमिंटनमध्ये महिला एकेरीचे सुवर्णपदक कोणत्या देशाने पटकावले?

अ) स्पेन ब) जपान क) चीन ड) इंडोनेशिया

  • उत्तरे : १. क, २. ब, ३. ड, ४. अ

मनाली रानडे

manaliranade84@gmail.com

First Published on January 7, 2018 1:22 am

Web Title: information about badminton sport