News Flash

प्रेरणादायी चरित्र

'अमिलिया एयरहार्ट' हे कीर्ती परचुरे लिखित पुस्तक म्हणजे अटलांटा समुद्रावरून विमान चालवणारी पहिली महिला पायलट अमिलिया एअरहार्ट हिचं चरित्र. या चरित्रात अमिलियाचा धाडसी, कर्तृत्ववान आणि

| November 16, 2014 06:27 am

‘अमिलिया एयरहार्ट’ हे कीर्ती परचुरे लिखित पुस्तक म्हणजे अटलांटा समुद्रावरून विमान चालवणारी पहिली महिला पायलट अमिलिया एअरहार्ट हिचं चरित्र. या चरित्रात अमिलियाचा धाडसी, कर्तृत्ववान आणि कष्टदायी जीवनप्रवास शब्दांकित केला आहे. हा जीवनप्रवास लहानग्यांसाठी प्रेरणादायी ठरेल असा आहे.
अमिलिया ज्या काळात जन्मली (२४ जुलै १८९७) त्या काळात अमेरिकेतही स्त्रियांचं विश्व हे घरापुरतंच मर्यादित होतं. परंतु तिचे आजोबा आणि आई स्वतंत्र विचारसरणीचे होते. त्यांनी मुलींना चाकोरीबद्ध जीवनात अडकवलं नाही. परिणामी अमिलिया व तिच्या बहिणीवर बंधमुक्त जीवन जगण्याचे संस्कार झाले. याच संस्कारांचा परिणाम म्हणून आमिलियानेही शेवटपर्यंत स्त्रीस्वातंत्र्याचा पुरस्कार केला आणि तीही तशीच जगली.
अमिलियाचं बालपण तसं कष्टदायी गेलं. परंतु त्याबद्दल कुठलीही तक्रार न करता स्वकष्टाने ती जीवनात पुढे मार्गक्रमण करीत राहिली. आयुष्यात अनेक चढ-उतार सोसताना तिनं कधीही आपल्यातलं बळ कमी होऊ दिलं नाही. हे करत असताना परिस्थितीविषयी ती रडगाणं गात बसली नाही. दुसऱ्याला मदतीचा हात देणं, स्त्रीस्वातंत्र्याचा पुरस्कार ही कामं ती करीत राहिली. या पुस्तकात तिच्या धाडसी, बेधडक आणि माणूस म्हणून तितकंच जबाबदारीनं वागणं, या गुणांना दर्शविणारे प्रसंग शब्दांकित केले आहेत. तिचं गगनभरारीचं स्वप्न तिला प्रत्यक्ष जीवनात खूप उंचीवर घेऊन गेलं. पण यामागे तिची दुर्दम्य इच्छाशक्ती, धाडसीपणा आणि नवनवीन आव्हानांना समर्थपणे तोंड देण्याची वृत्ती, हेच गुण कारणीभूत होते. मनात प्रचंड इच्छाशक्ती आणि जिद्द असेल तर एक सामान्य व्यक्तीही असामान्य काम करू शकते, हेच तिच्या चरित्रातून प्रामुख्यानं दिसून येतं.
‘अमिलिया एयरहार्ट’, कीर्ती परचुरे,
कनक बुक्स, पृष्ठे – ६४,
मूल्य – ५० रुपये.

रशियन लोककथांचा खजिना
कुठल्याही देशाच्या लोककथा वाचणं, ऐकणं हा एक मजेशीर, त्याचबरोबर व्यक्ती म्हणून स्वत:ला समृद्ध करणारा अनुभव असतो. जगभरातील लोककथांमध्ये रशियन लोककथांचे वेगळे स्थान आहे. ‘मालाकाईटची मंजूषा’ हा पावेल बाज्झोव यांनी एकत्रित केलेल्या रशियन लोककथांचं पुस्तक मराठीत अनुवादित झालं आहे. हा अनुवाद  मुग्धा कर्णिक यांनी केला आहे.
‘मालाकाईट’ हा हिरवानिळा, मोरपिशी रंगाचा दगड. तो रशियातल्या उराल परिसरातल्या तांब्याच्या समृद्ध खाणींमध्ये सापडतो. या खडकांतल्या रंगछटांमुळे हा दगड कोरीव वस्तू, अलंकार तयार करण्यासाठी वापरला जातो. या परिसरातील खडकांबरोबरच अनेक रत्नं व मौल्यवान धातू सापडतात. या खाणींच्या परिसरातले जमीनदार, गुलाम, खाणकामगार यांचं जगणं मांडणाऱ्या लोककथा येथे जन्माला आल्या. ‘ताम्रपर्वताची राणी’ हे या लोककथांमधलं मुख्य पात्र. या पात्राभोवती फिरणाऱ्या या लोककथा चमत्कारिक, अद्भुत वाटतात. पण एक वेगळं समाजजीवन त्यातून प्रकर्षांनं जाणवतं. या लोककथांमधून अनेक मानवी भावभावनांचे पदर उलगडत जातात.
‘मालाकाईटची मंजुषा’,
मूळ  लेखक : पावेल बाज्झोव,
अनुवाद : मुग्धा कर्णिक
कनक बुक्स (डायमंड पब्लिकेशन्स)
पृष्ठे – १६६,  
मूल्य – १५० रुपये.

आर्ट गॅलरीLR15

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 16, 2014 6:27 am

Web Title: inspiring biographies
टॅग : Balmaifil,Biography
Next Stories
1 चमचम चांदणं गगनात..
2 वाचावे नेमके किशोरवयीन मुलांसाठी..
3 डोकॅलिटी
Just Now!
X