आज आपण चित्रकलेतली जादू पाहणार आहोत, तीसुद्धा शाई संपलेल्या पेनातून करायची आहे बरं का? तुम्हाला काढावयाचे असलेले चित्र एका पातळ कागदावर काढून घ्या. मग चित्राचा एक जाड कागद घ्या. चित्र काढलेला पातळ कागद आता या जाड कागदावर ठेवा व रिफिल संपलेल्या बॉलपेनाने पातळ कागदावरच्या
चित्राचे रेखाटन जरा जास्त दाब देऊन
गिरवा. हे करत असताना जाड कागदाखाली मऊ कागदाची घडी ठेवा. अशा प्रकारे
जाड कागदावर दिसत असलेल्या कोरीव-
कामावर ऑइल पेस्टलने रंगवा आणि पहा- कोऱ्या दिसणाऱ्या कागदावर चित्र दिसू लागेल. माशांचे खवले, पाने,
दगडी कोरीवकाम अशा अनेक ठिकाणी या पद्धतीचा वापर करून चित्रात वेगळेपणा आणता येईल. मग करून पाहणार ना
ही जादू!
जयश्री कासखेडीकर-पाठक – pathakjayashree23@gmail.com