News Flash

उन्हाळा

सुरू झाला उन्हाळा ४२ वर पारा झरझर झरल्या घामाच्या धारा

उन्हाळय़ात डोक्यावर टोपी घाला

सुरू झाला उन्हाळा

४२ वर पारा

झरझर झरल्या

घामाच्या धारा

 

एसी, कुलर

गरागरा पंखा

वाळय़ाचे पडदे

देती गारवा

 

थंडगार पन्हे

कोल्डड्रिंग्स, पेप्सी

बर्फाच्या गोळय़ाची

मज्जाच न्यारी

खस-लिंबाचे

सरबत मस्त

काकडी, कलिंगड

होई फस्त

 

उन्हाळय़ात डोक्यावर

टोपी घाला

डोळय़ाला गॉगल

नक्की लावा

आपणच आपली

घ्यायची काळजी

उन्हाळय़ापासून

तब्येत जपायची

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 18, 2015 1:17 am

Web Title: klika mahajan poetry
Next Stories
1 कांदेपोहे
2 स्थानिक व अस्थानिक वनस्पती
3 गोगलगाय
Just Now!
X