छोटय़ा दोस्तांनो, तुम्ही ओरिगामीबद्दल ऐकलेच असेल. ओरिगामी म्हणजे कागदाला विशिष्ट पद्धतीने तसेच विशिष्ट क्रमाने घडय़ा घालून सुंदर वस्तू तयार करणे. एका कागदापासून तुम्ही प्राणी-पक्षी, फुले-पाने, वाहने, बॉक्सेस मुखवटे यासारख्या अगणित वस्तू तयार करू शकता. यात हलणाऱ्या वस्तू उदाहरणार्थ, उडय़ा bal04मारणारा बेडूक, पंख हलवणारे पक्षी यासारख्यांचा समावेश होतो.
कागदाच्या होडय़ा करून पाण्यात सोडणे, विमान किंवा रॉकेट बनवून ते हवेत उडवणे असे खेळ तुम्ही खेळतच असाल. आपण होडी किंवा विमान वर्षांनुवष्रे अगदी सहजपणे बनवतो आहोत, जो ओरिगामीचाच एक प्रकार आहे. कागदाची होडी बनवण्यासाठी एक चौरसाकृती कागद लागतो. केवळ चार घडय़ा घातल्या की झाली तुमची होडी तयार! पण त्याच कागदाला थोडय़ा वेगळ्या पद्धतीने घडय़ा घातल्या तर केवळ पाच घडय़ांमध्ये मांजराचे किंवा कुत्र्याचे तोंड बनवता येते. तसेच तेरा घडय़ा घातल्या तर अस्वलाचे तोंडही बनवता येते. आहे की नी मजेशीर?
ओरिगामीमध्ये घडय़ा घालण्याच्या प्रकाराबरोबरच त्यांचा क्रमदेखील महत्त्वाचा असतो. क्रम चुकला तर आपण बनवत असलेली वस्तू योग्य पद्धतीने बनणार नाही.  bal04
आज आपण ओरिगामी शिकवणाऱ्या काही साइटस् बघू.  http://en.origami-club.com/easy/index.html  यात प्राणी, पक्षी, वाहने, फुले इत्यादी आकृत्या आणि अ‍ॅनिमेशनच्या साहाय्याने बनवायला शिकवल्या आहेत.
या साइटमध्ये समावेश केलेल्या वस्तूंमधील काही वस्तू करायला अगदी सोप्या आहेत. तर काही थोडय़ा गुंतागुंतीच्या आहेत. उदाहरणार्थ, अ‍ॅनिमल या विभागातील बर्ड या उपविभागात हंस बनवण्याची पद्धत सोपी   आहे, तर कोंबडा बनवण्याची पद्धत थोडी कठीण आहे. पण सरावाने तुम्ही कौशल्य प्राप्त करू शकाल आणि या वस्तू सहजपणे बनवू शकाल. उन्हाळ्याच्या सुट्टीत मित्र-मत्रिणींचा ग्रुप बनवून एकमेकांच्या सहकार्याने यात बरीच मजल मारू शकाल.
तशीच आणखी दुसरी साइट म्हणजे   http://howset.com/cat/how-to-make-origami/#.VRWLWNF_mP8<#.VRWLWNF_mP8&gt; . या साइटवरदेखील ओरिगामी वस्तू बनवण्याचा खजिना सापडेल.bal03
ओरिगामी करत असताना तुमच्या मेंदूला सतत चालना मिळत असते. हात आणि डोळे यांमध्ये एकप्रकारची सुसूत्रता येते. तुमची एकाग्रता वाढते. वस्तू बनवत असताना तिचा क्रम लक्षात ठेवायचा असल्याने तुमची स्मरणशक्ती ताजीतवानी होते. कल्पनाशक्ती वाढते. ओरिगामीचा गणिताशी जवळचा संबंध असल्याने गणिती आणि भौमितिक संकल्पना सहजपणे समजू शकतात. तसेच प्रमाणबद्धता, सममिती या संकल्पनासुद्धा आत्मसात करता येतात.
या सर्व फायद्यांपेक्षा महत्त्वाचे म्हणजे आपण स्वत: काहीतरी नावीन्यपूर्ण केल्याचा आनंद तुम्हाला उपभोगता येईल आणि मोठय़ांकडून शाबासकीही मिळेल.bal01

How useful was the Green Revolution really
हरितक्रांती खरंच कितपत उपयुक्त ठरली?
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
Martand Sun Temple, Kashmir
विश्लेषण: काश्मीरमधील १६०० वर्षे जुने मार्तंड सूर्यमंदिर उद्ध्वस्त करणारा ‘तो’ परकीय आक्रमक कोण?
How to Remove Hair from Your Upper Lip Naturally
Dark Upper Lips: आता अप्पर लिप्स करण्यासाठी पार्लरची गरज नाही; या ४ घरगुती उपायांनी मिळवा सुटका