अलकनंदा पाध्ये

जयेश आणि रूपाच्या सहामाही परीक्षेचा शेवटचा पेपर संपला. पेपर चांगले गेल्यामुळे दोघेही खुशीत होते. त्यांची आई त्यांना नवे कपडे घेण्यासाठी लवकरच बाजारात घेऊन जाणार होती. जयेशने त्याच्या दोस्तासारखीच जीन्स घ्यायची ठरवले होते. तसे त्याने रूपाजवळ जाहीर करून टाकले होते. ‘‘तू कुठला ड्रेस घेणार गं?’’ ..पण जयेशच्या बोलण्याकडे रूपाचे लक्षच नव्हते. ती काही तरी विचारात दिसत होती. ‘‘ए रूपाताई.. लक्ष कुठाय तुझं? तुला काही होतंय का?’’ त्याच्या प्रश्नाने रूपा भानावर येऊन म्हणाली, ‘‘अरे, तसं काही नाही, पण कालपासून एक विचार येतोय माझ्या मनात.’’

Nashik heat, Temperature Hits New High, 40 Degrees Celsius, nobody on manmad street market, summer, summer news, summer in nashik, heatwave in nashik, heat wave in manmad, manmad news, nashik news,
नाशिक : उंचावणाऱ्या तापमानाने आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ, मनमाडमधील रस्त्यांवर असलेला शुकशुकाट
Birds mumbai, Birds suffer from heat,
मुंबई : वाढत्या उष्म्याचा पक्ष्यांना त्रास, १६ दिवसांमध्ये १०० हून अधिक पक्षी व प्राणी रुग्णालयात दाखल
In Vidarbha thousands of hectares of orchards and crops were destroyed due to unseasonal rains
विदर्भात हजारो हेक्टरवरील फळबागा, पिकांची नासाडी; तिसऱ्या दिवशीही अवकाळीचे तांडव
surya grahan 2024 negative impact of solar eclipse on these three zodiac sign read more
५४ वर्षांनंतर सूर्यग्रहणात तयार होणार दुर्मीळ योग, ‘या’ तीन राशींच्या अडचणी वाढणार?

‘‘कसला विचार? मलापण सांग ना.’’ – इति जयेश.

‘‘थांब, जेवताना सांगते,’’ म्हणत रूपाने घराचे कुलूप उघडले. हातपाय धुऊन दोघे जेवायला बसले. त्यांच्या खूप लहानपणीच त्यांचे बाबा एका अपघातात वारले होते. जयेशला तर त्यांचा चेहराही नीट आठवत नसे. तेव्हापासून त्यांची आईच दोघांची आई आणि बाबा बनली होती. पहाटे उठून ती घरचे स्वयंपाकपाणी करून जवळच्या कॉलनीतल्या बऱ्याच घरांत पोळीभाजी करायला जात असे. त्यामुळे रूपा आणि जयेश दोघांनाही घरातील साफसफाई, आपले स्वत:चे कपडे धुणे किंवा भांडी घासणे वगरे कामांची सवय झाली होती. ‘‘हं.. आता सांग कसला विचार करतेयस?’’ जेवता जेवता जयेशने विचारले.

‘‘अरे, त्या दिवशी शेजारच्या आशामावशी आईशी गप्पा मारत होत्या ना तेव्हा त्यांच्या बोलण्यातून कळलं की आपल्या आईचा वाढदिवस येत्या रविवारी येतोय. दिवाळी संपल्यावर. आईचाही वाढदिवस असतो असा आपण कधी विचारच केला नाही रे. तुला माहिती होता का रे तिचा वाढदिवस?’’ रूपाने विचारले.

‘‘छे गं, पण ती मात्र बिचारी आपल्या वाढदिवसाला काय काय खायला बनवते आणि गिफ्टही देते. रूपाताई आपणपण साजरा करू या का गं तिचा वाढदिवस? आणि काय भेट देऊ ते तिलाच विचारू या?’’ – जयेश.

‘‘हॅट हॅट.. तुला काय वाटतं, ती असं करायला आपल्याला परवानगी देईल? वेडा कुठला. पण या वेळी आपण तिला वाढदिवसाला सरप्राईज देऊ या. पण.. हे सगळं गुपित आपल्या दोघांतच ठेवावं लागेल हं. काय बरं द्यायचं तिला? तिच्या उपयोगाची काहीतरी वस्तू नक्की घेऊन देऊ या.’’ रूपा म्हणाली.

‘‘अगं, पण भेट आणायला पसे लागतील ना? ..माझ्या पिगी बँकेत बघतो किती आहेत ते. तूपण बघ तुझ्याकडे किती आहेत ते. दोघांचे मिळून किती पसे होतात ते बघू आणि त्यातूनच काही तरी मस्त वस्तू घेऊ.’’

‘‘नाही हं, बिल्कुल नाही. तिला न सांगता आपण पिगी बँकेला हात लावलेला तिला अजिबात आवडणार नाही.’’ रूपाने पिगी बँकेची आयडिया एका मिनिटात खोडून काढली.

‘‘मग काय करायचं गं?’’ -जयेश

‘‘तोच तर विचार करतेय केव्हापासून, तुलाही बघ काही आयडिया सुचतेय का,’’ असे म्हणत रूपा हात धुवायला उठली.

भांडय़ांची आवराआवर करताना रूपाच्या डोक्यात एक कल्पना चमकून गेली. ‘‘ए जयू, आयडिया सुचली..’’ म्हणत ती धावतच जयेशकडे आली. आज संध्याकाळी ना, मी शेजारच्या जाई आणि तिच्या आईबरोबर- आशामावशींबरोबर कुंभारवाडय़ात जाणाराय. तुला माहितेय ना, त्या किती छान आर्टस्टि आहेत. त्या तिथून त्यांच्यासाठी मातीच्या पणत्या आणि मस्त आकाराचे मातीचे दिवे वगरे आणायला जाणारेत. परीक्षा संपली म्हणून मीपण त्याच्याबरोबर जाणार आहे. तिथे ना हे सामान सगळं स्वस्त मिळतं म्हणतात. आपण फक्त मावशींनाच आपला हा प्लॅन सांगू या.. आत्ता त्यांच्याकडून पणत्या आणि रंगांसाठी वगरे पसे घेऊ, मग आपण पुष्कळ पणत्या आणू. माझी चित्रकला छान आहे असे सगळे जण तुम्ही नेहमी म्हणता की नाही, मग मी त्या पणत्या छान रंगाने रंगवीन, त्यावर छान नक्षी वगरे काढीन. वाटल्यास मावशींना विचारून करीन.’’

रूपाची आयडिया जयेशला जामच आवडली. तो लगेच म्हणाला, ‘‘चालेल चालेल. तू पणत्या रंगवायचं काम कर, मी त्या विकायचं काम करतो. आलेल्या पशांतून आधी मावशींचे पसे परत करू आणि बाकीचे पसे म्हणजे.. त्याला काय नफा म्हणतात ना.. त्यातून आईसाठी काही तरी आणू या आणि तिला ती वाढदिवसाची भेट देऊ या. एकदम चकित करू या हं.’’ दोघेही या कल्पनेने हातात हात घेऊन नाचायलाच लागले. ‘‘ए.. पण हे सर्व आईच्या नकळत हं.’’ रूपाने पुन्हा बजावले. ठरल्याप्रमाणे दोघांनी आशामावशीला आपल्या प्लॅनमध्ये सामील करून घेतले. त्यामुळे जाईही आपसूकच सामील झाली. संध्याकाळी रूपाने कुंभारवाडय़ातून १०० पणत्या घेतल्या. मावशीनेपण बरेच सामान घेतले. मात्र रूपाने आपल्या पणत्या आईला कळायला नको म्हणून जाईकडेच ठेवल्या. आई घरकामाला गेल्यावर ती पार संध्याकाळीच घरी यायची. त्यामुळे दोघांना पणत्या रंगवायला भरपूर वेळ मिळणार होता. रूपा मावशींकडे गेली त्या वेळात जयेशने स्वत:च्या आणि रूपाच्याही वाटणीची घरातली कामे पूर्ण केली. एरवी एकमेकांच्या वाटणीचे काम करायला लागले तर दोघे कुरकुर करायचे, पण त्यांचा प्लॅन पूर्ण करण्यासाठी काहीही करायची तयारी होती त्यांची. हा हा म्हणता रूपाच्या सगळ्या पणत्या रंगवून झाल्या. अर्थात, जाई आणि जयेशनेही त्यावर टिकल्या, चमचम चिकटवायला मदत केली. मधल्या काळात त्यांच्या गल्लीच्या तोंडाशी असलेल्या गुलमोहोर सोसायटीच्या गेटशी फुलवाल्या आज्जी बसायच्या. या मुलांशी त्या नेहमी छान गप्पा मारायच्या. जयेशने त्यांच्याकडे जाऊन त्याचा प्लॅन सांगून त्यांच्या शेजारी पणत्या विकायला बसायची परवानगी मागितली. त्यांनाही मुलांचे खूप कौतुक वाटल्याने त्यांनी ती आनंदाने दिली.

दुसऱ्या दिवशी जयेशने आशामावशीने दिलेल्या खोक्यात तयार झालेल्या पणत्या अलगद ठेवल्या आणि तो आजींजवळ जाऊन ‘‘पणत्या, हाताने रंगवलेल्या सुंदर सुंदर पणत्या घ्या..’’ असे येणाऱ्या-जाणाऱ्याला सांगू लागला. फुले घ्यायला येणाऱ्या प्रत्येकाचे त्या सुंदर पणत्यांकडे लक्ष जाई आणि छोटय़ा मुलाचे कौतुक म्हणून लोक पटापट त्या विकत घेत होते. संध्याकाळपर्यंत बऱ्याच पणत्या संपल्या. तेवढय़ात एक काका आले. त्यांना तर पणत्या खूपच आवडल्या.

‘‘ए बाळा, मला दिवाळीत माझ्या ऑफिसच्या लोकांना भेट द्यायला किमान ३०० पणत्या पाहिजेत. मिळतील का?’’ त्यांनी विचारले तेव्हा इतकी मोठी ऑर्डर ऐकून जयेशचे डोळे चमकले. पण एक मिनिट विचार करून तो म्हणाला, ‘‘काका, आत्ता माझ्याकडे तयार नाहीत, पण आजपासून बरोब्बर चार दिवसांत मी तुम्हाला पणत्या देईन, हवे तर तुमच्या घरी आणून देईन.’’ काकांना त्याचे खूप कौतुक वाटले. फुलवाल्या आजीनेही कौतुक केल्यामुळे काकांना त्याच्याबद्दल विश्वास वाटला. त्यांनी खिशातून पणत्या खरेदीसाठी त्याला आगाऊ पसेही दिले. संध्याकाळी त्याने रूपा आणि जाईला हे सांगितल्यावर तर सगळे आनंदाने नाचायलाच लागले. दुसऱ्या दिवशी पुन्हा सगळ्यांची वरात कुंभारवाडय़ात मावशीबरोबर पोहोचली. तिथून पुन्हा पणत्यांची खरेदी झाली आणि जयेशसकट सगळेच पणत्या रंगवायच्या कामाला लागले. काकांना कबूल केल्याच्या आदल्याच दिवशी पणत्या तयार झाल्या. दुसऱ्या दिवशी तिघेही काकांच्या घरी पणत्या द्यायला गेले तेव्हा त्यांनी सगळ्यांना खाऊ दिला. त्यांच्या मेहनतीचे खूप कौतुक करून वर मुले नको म्हणत असतानाही ठरल्यापेक्षा थोडे जास्तच पसे दिले.

आनंदाने उडय़ा मारतच मुले घरी आली. रूपाने हिशोब करून आधी मावशीचे पसे परत केले. ‘‘आता या पशातून आईसाठी काय घ्यावं बरं? असं काही तरी घेऊ की ते कायमचं राहील आणि उपयोगी होईल.’’ यावर दोघांचे एकमत झाले.

‘‘अरे, तुमच्या आईला एक छोटा मोबाईल घेऊन द्या की.. आजकाल किमती खूप कमी झाल्यात. फोनमुळे तिला बचत गटातून किंवा कुणाकडून निरोप देणं-घेणं सोपं जाईल. मध्यंतरी ती माझ्याकडे फोनबद्दल चौकशी करीत होती.’’ आशामावशीची आयडिया सर्वानाच आवडली.

मावशीच्या मदतीने स्वकमाईच्या पशातून मुलांनी फोनची खरेदी केली. दिवाळीची धामधूम संपली. रविवारी मुलं लवकर उठली हे पाहून आईला जारा आश्चर्यच वाटलं. मुलांनी ‘‘हॅप्पी बर्थडे आई..’’ म्हणत तिच्या हातात एक सुंदरसा बॉक्स ठेवला. चकित होऊन तिने बॉक्स उघडला तेव्हा त्यातला मोबाईल फोन बघून तर तिच्या डोळ्यांत पाणीच आले. इतक्यात आत येत ‘‘काय मग.. आवडली का मुलांची वाढदिवसाची भेट?’’ असे विचारणाऱ्या आशामावशीने आईला दोन्ही मुलांची दिवाळीतल्या दवसांची धडपड सांगितली. ते ऐकून आईला काय बोलावे तेच सुचेना. मुलांच्या या प्रेमाने, त्यांच्या मेहनतीने ती भारावून गेली. आईचा आनंदी चेहरा पाहून रूपा आणि जयेशही खूश झाले.

alaknanda263@yahoo.com