23 February 2019

News Flash

डोकॅलिटी

शब्दकोडे सोडवणे हा सर्व आबालवृद्धांचा आवडता छंद आहे.

|| ज्योत्स्ना सुतवणी

शब्दकोडे सोडवणे हा सर्व आबालवृद्धांचा आवडता छंद आहे. आजच्या शब्दकोडय़ांत विज्ञानाशी संबंधित शब्द ओळखायचे आहेत.

आडवे शब्द

१) पूर्वेकडे तोंड करून उभे राहिले असता डाव्या हाताकडची दिशा.

३) सुक्या मेव्यातील एक फळ.

५) नेत्रगोलक कडक होऊन निर्माण होणारा दृष्टिदोष.

७) गव्हाचे पीठ, आटा.

८) मूलद्रव्य, संयुगे व त्यांचे गुणधर्म यांचा अभ्यास — या शास्त्रात होतो.

९) पृथ्वी सभोवतालच्या वातावरणात —, स्थितांबर व दलांबर यांचा समावेश होतो.

११) संथ पाण्यात दगड टाकला असता वर्तुळाकार — तयार होतात.

१३) यांना हवा, पाणी आणि अन्न यांची गरज असते.

१४) पृथ्वीच्या वातावरणापलीकडील पोकळीस — म्हणतात. जेथे अनेक ग्रह, सूर्यमाला व तारकासमूह इत्यादी आहेत.

१५) एक तंतुवाद्य जे बोटात घातलेल्या मिझराबाने (नखीने) छेडतात.

 

उभे शब्द

१) आजारी व्यक्तीवर योग्य वेळी — करणे गरजेचे असते.

२) १२०/८० हा सामान्य — मानला जातो.

४) पाठीच्या कण्यातले हाड.

६) अधातू हे उष्णता व विद्युत यांचे — आहेत.

७) अर्धवर्तुळाकार दरवाजा/ खिडक्यांचे बांधकाम.

८) रेडिओ लहरींद्वारे आकाश, पृथ्वीवरील वस्तूचे स्थान संगणकासारख्या पडद्यावर दाखवणारी यंत्रणा.

१०) जनावरांना चारा आणि वैरण उपलब्ध करून देण्यासाठी याची लागवड केली जाते.

१२) पानगळीनंतरचा पालवीने बहरून जाणारा ऋतू.

१४) बाहेरून कडक, काटेरी खवले असलेले, परंतु आतून रसरशीत असलेले फळ .

१५) विस्थापन, वेग, त्वरण, बल या — राशी आहेत.

 

उत्तरे : आडवे शब्द

१) उत्तर

३) बदाम

५) काचबिंदू ७) कणीक

८) रसायन

९) तपांबर ११) तरंग १३) सजीव १४) अवकाश १५) सतार.

 

उभे शब्द

१) उपचार

२) रक्तदाब ४) मणका

६) दुर्वाहक ७) कमान

८) रडार

१०) गवत १२) वसंत १४) अननस १५) सदिश.

jyotsna.sutavani@gmail.com

First Published on July 8, 2018 5:29 am

Web Title: loksatta lokrang marathi articles 30