18 October 2019

News Flash

डोकॅलिटी

सोबत दिलेल्या सूचक माहितीवरून विशिष्ट अक्षरसमूहांनी शेवट होणारे शब्द तुम्हाला ओळखायचे आहेत.

|| ज्योत्स्ना सुतवणी

सोबत दिलेल्या सूचक माहितीवरून विशिष्ट अक्षरसमूहांनी शेवट होणारे शब्द तुम्हाला ओळखायचे आहेत.

सूचक माहिती :- १) बुडत्याला काडीचा— २) आज नगद उधार—  ३) राम गणेश गडकरी यांचे टोपणनाव ४) विष्णु वामन शिरवाडकर यांचे टोपणनाव  ५) — देणे म्हणजे ठोसे लगावणे, गुद्दे मारणे ६) ठराव/सूचना यांना दुजोरा, पाठिंबा देणारा ७) जम्मू-काश्मीरमधील गोडय़ा पाण्याचे सरोवर ८) जगातील अनेक राष्ट्रांचे चलन ($) ९) शोभिवंत किनार, नक्षीदार काठ १०) कोठे इंद्राचा —  कोठे शामभट्टाची तट्टाणी ११) देखल्या देवा — १२) लाकूड कापण्याचे हत्यार

 

उत्तरे :- १) आधार २) उधार ३) गोविंदाग्रज ४) कुसुमाग्रज ५) मुष्टिमोदक ६) अनुमोदक ७) वुलर ८) डॉलर ($) ९) झालर १०) ऐरावत ११) दंडवत १२) करवत

jyotsna.sutavani@gmail.com

 

First Published on April 21, 2019 12:01 am

Web Title: loksatta puzzle game 13