22 May 2019

News Flash

डोकॅलिटी

सोबत दिलेल्या सूचक माहितीवरून तुम्हाला दोन अक्षरी शब्द शोधून शब्दसाखळी (अंताक्षरी) पूर्ण करायची आहे.

|| ज्योत्स्ना सुतवणी

सोबत दिलेल्या सूचक माहितीवरून तुम्हाला दोन अक्षरी शब्द शोधून शब्दसाखळी (अंताक्षरी) पूर्ण करायची आहे.

सूचक माहिती-

१)  याची कणसे भाजून किंवा उकडून खातात.

२)  या फणसातील गरे कडक, चवीला जास्त गोड व रुचकर असतात.

३)  थर्मामीटरमध्ये याचा उपयोग केला जातो.

४)  मेषपासून मीनपर्यंत एकूण १२ — आहेत.

५)  शिजलेल्या भाताचा एक दाणा; थंड

६)  —– तापला आहे तर भाकरी भाजून घ्या. (योग्य वेळी आपले काम साधून घ्यावे या अर्थाची म्हण)

७)  पाणी किंवा द्रव पदार्थाचे उष्णतेमुळे बनणारे वायुरूप

८)  जनावरांच्या अंगावरील मऊ  व दाट केस ज्यांपासून टोप्या, जाकिटे बनवतात.

९)  फाटलेले वस्त्र उभे-आडवे धागे घालून शिवणे

१०)  उमललेली कळी

११)  रोग होऊ  नये म्हणून देण्यात येणारे प्रतिबंधक औषध.

१२)  दोनने भाग जाणाऱ्या संख्यांना — संख्या म्हणतात.

 

उत्तरे-

१) मका २) कापा ३) पारा ४) राशी ५) शीत ६) तवा ७) वाफ ८) फर

९) रफू १०) फूल ११) लस १२) सम

First Published on May 5, 2019 12:07 am

Web Title: loksatta puzzle game 14