01 March 2021

News Flash

डोकॅलिटी

चला जाऊ  या, कोडय़ांच्या जगात!

जानेवारी महिन्याच्या या कोडय़ात ‘ज’ या अक्षराने सुरू होणारे वैज्ञानिक शब्द ओळखायचे आहेत. शब्दांचे पहिले अक्षर ‘ज’ च्या बाराखडीतील असावे. यासाठी जराशी मदत म्हणून सूचक माहितीही दिलेली आहे. चला जाऊ  या, कोडय़ांच्या जगात!

१) सूक्ष्म जीव, वनस्पती व प्राणी ज्यात आढळतात असे पृथ्वीभोवतालचे आवरण.

२) अन्नघटकांत आढळणारे जीवनावश्यक कार्बनी पदार्थ.

३) आफ्रिकेतील किलीमांजारो आणि जपानमधील फुजियामा ही या पर्वताची उदाहरणे.

४) केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेली शेतजमीन.

५) यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करणारे यंत्र.

६) उत्खननात मिळणारे मृत जीवांचे अवशेष.

७) न्यूटनचा पहिला नियम या संकल्पनेची व्याख्या करतो.

८) हे प्लॅस्टर ऑफ पॅरिस तयार करण्यासाठी वापरतात.

९) ऊर्जामापनाचे एकक.

१०) संगणकाच्या प्रोग्रॅमिंगची वापरली जाणारी एक लोकप्रिय भाषा.

 

  • उत्तरे : १) जीवावरण २) जीवनसत्वे ३) ज्वालामुखी ४) जिराईत ५) जनित्र ६) जीवाश्म ७) जडत्व ८) जिप्सम ९) ज्यूल १०) जावा

 

ज्योत्स्ना सुतवणी

jyotsna.sutavani@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 21, 2018 2:38 am

Web Title: loksatta puzzle game 2
Next Stories
1 लिंबू सरबत
2 इंटरनेटच्या सफरीवर..
3 ग्रेट भेट
Just Now!
X