मित्रांनो, तुम्ही सापशिडीसारख्या खेळात वापरला जाणारा फासा हाताळला असेलच. या घनाकृती फाशाचा पृष्ठभाग उलगडला असता कसा दिसू शकतो याचे एक चित्र सोबतच्या पहिल्या आकृतीत दिले आहे. यातील रेषांवर घडय़ा घालून हा दुमडला असता पुन्हा घनाकृती तयार होईल हे तुम्ही ओळखले असेलच. (ज्यांना हे करून पाहायचे असेल त्यांनी असा आकार कापून, घडय़ा घालून प्रत्यक्ष अनुभवावे) असा घन तयार झाल्यावर फाशाचे १ व ४ क्रमांक एकमेकांच्या विरुद्ध बाजूस असतील. तसेच २ च्या विरुद्ध ६ आणि ३ विरुद्ध ५ अशा जोडय़ा एकमेकांच्या विरुद्ध बाजूला असतील.

आजचे आपले कोडे फाशांवरील क्रमांकांशी संबंधित आहे. सोबत दिलेल्या इतर आकृत्या रेघांवर दुमडल्या की घनाकृती फासा तयार होतो. मनातल्या मनात त्या दुमडून हा घन कसा असेल याचा विचार करा. तुम्हाला शोधायचे आहे की, अशा घनाच्या रंगीत बाजूच्या विरुद्ध बाजूस कुठला क्रमांक असेल?

उत्तर : फाशाच्या रंगीत बाजूच्या विरुद्ध बाजूस असलेला अंक :-  आकृती २- ४, आकृती ३- १, आकृती ४- ४, आकृती ५- ४.

अशा एकूण ११ विविध आकृत्या असू शकतात.

मनाली रानडे

manaliranade84@gmail.com