रामायण कथा ही राम-लक्ष्मणांनी राक्षसांविरुद्ध दिलेल्या लढय़ाची गोष्ट सांगते. या कथेमध्ये लंकाधिपती रावणाशिवाय अनेक राक्षस/राक्षसींचा उल्लेख आलेला आहे. आणि हाच आपल्या आजच्या कोडय़ाचा विषय आहे. ही नावे शोधण्यासाठी तुम्हाला सूचक माहिती दिलेली आहेच.

१) कांचनमृगाचे रूप धारण करणारा

२) विश्वामित्रांच्या आज्ञेनुसार रामाने हिचा वध केला.

३) या पराक्रमी रावणपुत्राला इंद्रजित असेही नाव आहे.

४) झोपेसाठी प्रसिद्ध असलेला रावणाचा भाऊ .

५) मस्तक नसलेला, फक्त धड असलेला भयंकर राक्षस.

६) दंडकारण्यातील वास्तव्यात या राक्षसाला जिवंतपणीच राम-लक्ष्मणांनी भूमीमध्ये गाडले.

७) रामाशी विवाह करण्याची इच्छा व्यक्त करणारी राक्षसी.

८) रावण वधानंतर यास रामाने लंकेचा राजा बनवले.

९) पंचकन्यांमधे समावेश असलेली रावणाची पत्नी.

१०) सीतेवर माया करणारी अशोक वनातील राक्षसी.

११) शूर्पणखेच्या या दोन बंधूंनी रामाशी युद्ध केले.

 

उत्तरे :

१. मारिच  २.त्राटिका ३. मेघनाद  ४.  कुंभकर्ण  ५. कबंध  ६.  विराध.

७.  शूर्पणखा  ८. बिभीषण  ९. मंदोदरी १०.  त्रिजटा  ११.  खर-दूषण

 

– ज्योत्स्ना सुतवणी

jyotsna.sutavani@gmail.com