अमेरिकेतील टेस्ला (Tesla) या कंपनीने बाजारात नव्याने आणलेल्या इलेक्ट्रिक कारमुळे वाहन क्षेत्रात सनसनाटी निर्माण झाली आहे. तसे म्हटले तर इलेक्ट्रिक कार्स गेली दोन तीन दशके रस्त्यांवर धावत आहेतच. परंतु सध्या त्यांची संख्या एकूण वाहन संख्येच्या प्रमाणात अतिशय कमी आहे. तंत्रज्ञानातील नवीन शोधांमुळे हे चित्र मोठय़ा प्रमाणात पालटण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. माहीतगार मंडळींच्या मते, सन २०३० ते २०५० पर्यंत रस्त्यावरील बहुतांश वाहने (कार्स, स्कूटर्स, बसेस, मालमोटारी) विजेवर चालणारी असतील.

आजची रस्त्यावरची बहुतेक वाहने डिझेल, पेट्रोल यांसारख्या खनिज तेलांवर चालत असल्याने प्रदूषण निर्माण करतात. परंतु विद्युत वाहनांचे वैशिष्टय़ असे असेल की, त्यामुळे हे प्रदूषण निर्माणच होणार नाही. विद्युत वाहनांमधे कमीत कमी मूव्हिंग पार्टस् लागत असल्यामुळे अशा वाहनांच्या देखभालीचा खर्च देखील कमी होणार आहे.

टेस्ला कंपनीच्या या नवीन कारची बॅटरी एकदा चार्ज केल्यावर ३०० किमी.पर्यंत प्रवास करू शकते. बॅटरीचे तंत्रज्ञान अधिक प्रगत झाल्यावर भविष्यात ही मर्यादा आणखी वाढेल. ‘महिंद्रा आणि महिंद्रा’ या कंपनीने भारतीय परिस्थितीला अनुकूल अशा इलेक्ट्रिक कार्स बनवण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू केली आहे.

manaliranade84@gmail.com