रंगांच्या विविध छटांमुळे आपले जीवन आनंददायी झाले आहे. प्रकाशाच्या रंगांचे मिश्रण हे बेरीज पद्धतीचे मिश्रण (Additive Mixing) असते, तर रंगद्रव्यांचे मिश्रण हे वजाबाकी पद्धतीचे मिश्रण (Subtractive Mixing) असते.
छायाचित्र क्र. १ मध्ये पांढऱ्याशुभ्र पडद्यावर तीन प्राथमिक रंगांचे गोल दिसत आहेत – लाल, हिरवा, निळा (Red, Green, Blue, : Primary colours.)
छायाचित्र क्र. २, ३ व ४ मध्ये या प्राथमिक रंगांचे मिश्रण कसे होते ते पाहा.
लाल + हिरवा = पिवळा (Yellow)
हिरवा + निळा = मोरपिशी (Cyan)
निळा + लाल =  किरमिजी/अमसुली (Magenta)
पिवळा, मोरपिशी व किरमिजी या रंगांना दुय्यम रंग (Secondary Colours) असे म्हणतात. कारण ते प्राथमिक रंगांच्या मिश्रणाने बनतात.
छायाचित्र क्र. ५ मध्ये मध्यभागी तीनही प्राथमिक रंगांच्या मिश्रणाने पांढरा प्रकाश तयार झाला आहे. कारण पांढरा प्रकाश हा मूलत: ३ प्राथमिक रंगांपासून (R.G.B.) बनवता येतो.
सर आयझॅक न्यूटन यांनी सूर्यप्रकाशाचे काचेच्या प्रिझममधून पृथ:करण केले तेव्हा त्यांना पांढऱ्या पडद्यावर ७ रंगांचा पट्टा मिळाला (ता,ना,पि,हि,नि,पा,जा किंवा  V I B G Y O R ) पण प्रत्यक्षात या पट्टय़ांमध्ये म्हणजे वर्णपटात असंख्य रंगांच्या छटा असतात. केवळ ढोबळ मानाने व सोयीसाठी आपण त्यांना सात रंगांत विभागून टाकले आहे. मधल्या असंख्य छटा पाहायला खूप मजा येते. प्रत्यक्ष प्रयोग करून पाहा.
छायाचित्र क्र. ५ चे नीट निरीक्षण करून विचार करा की निळा आणि पिवळा प्रकाश मिसळला तर काय होईल? उत्तर आहे- पांढरा प्रकाश तयार होईल. तसेच लाल + मोरपिशी आणि हिरवा + किरमिजी यांचे उत्तरही पांढरा प्रकाश हेच आहे. म्हणून या रंगांच्या जोडय़ांना परस्पर-पूरक रंग (Complimentary colour) असे म्हणतात.
रंगीत सावल्या
पांढरा प्रकाश अपारदर्शक वस्तूने अडवला तर काळी सावली पडते, पण छायाचित्र क्र. ६ मध्ये बोटांची सावली मोरपिशी, ७ मध्ये किरमिजी व ८ मध्ये पिवळी दिसत आहे. कारण अनुक्रमे लाल, हिरवा व निळा दिवा झाकून ठेवला आहे. परस्पर-पूरक रंगांचा अर्थ आता जास्त स्पष्ट होतो. उदा. पांढऱ्या प्रकाशातून लाल रंग काढून टाकला तर मोरपिशी शिल्लक राहील.




हे उपकरण कसे तयार केले आहे ते थोडक्यात सांगतो. छायाचित्र क्र.९ पाहा. ३ पुठय़ांची नळकांडी घेऊन त्यात प्रत्येकी एक बहिर्गोल भिंग बसवलेले आहे. त्या प्रत्येक भिंगाच्या नाभी बिंदूवर (Focus) एक प्रखर प्रकाश देणारा रंगीत दिवा (R/G/B) बसवला आहे. हे दिवे म्हणजे Light Emitting Diodes (LED) आहेत. त्यांना ऊर्जा पुरवण्यासाठी ६ व्होल्टची रीचार्जेबल बॅटरी वापरली आहे. प्रत्येक LED च्या सीरिजमध्ये एक विद्युत रोध (Fixed Value Resistance) व एक कमी जास्त करता येणारा विद्युत रोध  (Variable Resistance) बसवला आहे. त्यामुळे या रंगांची तीव्रतासुद्धा कमी-जास्त करता येते. विशिष्ट प्रमाणात तीन प्राथमिक रंग मिसळले तर स्वच्छ पांढराशुभ्र प्रकाश मिळतो.  रंगद्रव्यांचे मिश्रण पुढील भागात वाचा.
(पूर्वार्ध)

Health Special, Pregnancy , dohale,
Health Special: गरोदरपणा आणि डोहाळे; किती खावे, काय टाळावे?
Womens health It is need to understand mentality of pregnant women
स्त्री आरोग्य : काय असतं गर्भवतीच्या मनात?
homemade mango ice cream recipe
Mango Ice-cream: मुलांसाठी घरच्या घरी बनवा आंब्याचे थंडगार आइस्क्रीम! वापरा फक्त ‘हे’ तीन पदार्थ
kairi curry recipe in marathi
Recipe : हिरव्यागार कैऱ्यांचे आंबटगोड सार; कसे बनवायचे पाहा कृती अन् प्रमाण