सात्विका आता मोठय़ा शाळेत जाते. तिच्या आजोबांनी लहानपणापासूनच तिला रोज पेपर वाचायची सवय लावली आहे. संध्याकाळी सगळे घरी आले की पेपरमधल्या बातम्यांबद्दल सगळे मिळून चर्चाही करतात. सात्विका लहान असली तरी तिच्या परीने तिचे मुद्दे मांडायला तिला नेहमीच प्रोत्साहन दिलं जातं. सात्विकाचा मामा त्याच्या ऑफिसच्या कामासाठी दोन दिवस मुंबईत म्हणजे सात्विकाकडे आलाय. तो सी.ए. आहे. सध्या तर रोज पेपर उघडल्यावर जुन्या नोटा, नवीन नोटा, ‘demonetization’ असं काय काय वाचायला मिळतंय. त्यामुळे संध्याकाळच्या चर्चासत्रात आर्थिक घडामोडींबद्दल मामाचं मत ऐकण्याची सगळ्यांनाच उत्सुकता असते. या चर्चा-गप्पांदरम्यान मामाला जाणवलं की सध्याच्या आर्थिक घडामोडींवर सात्विकाही विचारपूर्वक बोलते आहे. तिला अर्थशास्त्र हा विषय शाळेच्या अभ्यासात आहे आणि बऱ्याच जणांना कठीण वाटणारा हा विषय सात्विकाला मात्र इंटरेस्टिंग वाटतोय. सात्विकाला प्रोत्साहन देण्यासाठी अर्थशास्त्राशी- मार्केटशी संबंधित काहीतरी खेळ तिच्यासाठी आणायला हवा असं मामाला वाटलं आणि त्याने लगेचच ‘मोनोपॉली’ नावाचा खेळ तिला आणून दिला.

खेळ नक्की कसा आहे हे बघायची उत्सुकता आई-बाबा, आजी-आजोबा सगळ्यांनाच होती.

young man ask what are real benefits or just freedom by living away from their parents
“आईवडिलांपासून दूर राहण्याचे काही फायदे आहेत की फक्त स्वातंत्र्य..” तरुणाच्या पोस्टची एकच चर्चा, व्हायरल पोस्टवर तुमचे काय मत?
Saara Kahi Tichyasathi Fame Actor Abhishek Gaonkar engaged with social media sonalee patil
‘सारं काही तिच्यासाठी’ फेम अभिनेत्याचा प्रसिद्ध सोशल मीडिया स्टारशी मोठ्या थाटामाटात साखरपुडा, दोघांच्या ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष
Rape on 11 year girl
पाचवीतल्या मुलीवर बलात्कार आणि हत्या, दत्तक आई वडिलांचं क्रूर कृत्य
aarzoo khurana advocate and wildlife photographer documents Indias 55 tiger reserves
वकिली सोडली अन् धरली अनोखी वाट; वाइल्डलाइफ फोटोग्राफीत रमलेल्या आरजू खुरानाची गोष्ट

मामाने मोनोपॉली बॉक्समधून बाहेर काढता काढताच सांगायला सुरुवात केली, ‘साधारण ‘नवा व्यापार’ किंवा ‘बिझनेस’ या खेळासारखाच हा ‘मोनोपॉली’ खेळही आहे. त्यात एक बोर्ड असतो, सोंगटय़ा, डायस आणि १६ चान्स कार्ड्स आणि १६ कम्युनिटी चेस्ट कार्ड्स अशी ३२ कार्ड्स असतात. प्रॉपर्टी करण्यासाठी प्लास्टिकची ३२ घरं आणि १२ हॉटेल्स असतात. बोर्डवर ‘Go’, ‘Go to jail’, ‘free parking’ असे काही स्पेशल कॉर्नर्स असतात. खेळणऱ्यांपैकी एक जण बँकर असतो. ही घरं, हॉटेल्स, प्रॉपर्टी डीड्स सगळं कुणीतरी विकत घेईपर्यंत बँकरकडे असतं. प्रत्येक खेळाडूला खेळाची सुरुवात करताना खेळातले १५०० डॉलर्स मिळतात. ५००, १००, ५०, १०, ५ आणि १ डॉलर्समध्ये ते विभागलेले असतात. खेळताना आपली सोंगटी जर इलेक्ट्रिक कंपनी किंवा वॉटर वर्क्‍ससारख्या घरात आली तर तिथे लिहिलेली किंमत देऊन आपण ती प्रॉपर्टी विकत घेऊ  शकतो. आपण जर एखाद्या ठिकाणी घर किंवा हॉटेल केलेलं असेल तर दुसऱ्या खेळाडूला त्या ठिकाणी आल्यावर रेंट द्यावा लागतो. कधी गरज पडली तर आपली प्रॉपर्टी आपण विकू किंवा गहाण ठेवू शकतो. अशा अनेक गोष्टी आहेत. थोडक्यात सांगायचं तर बाकीच्या खेळाडूंना दिवाळखोर किंवा बँकरप्ट करून स्वत: जास्तीतजास्त प्रॉपर्टी निर्माण करायची असा हा खेळ असतो. जास्त माहितीसाठी आपण इंटरनेटवर या खेळाचा व्हिडीओसुद्धा बघू शकतो. पण मला वाटतंय हे सगळं नुसतं तोंडी सांगण्यापेक्षा आपण हा खेळ खेळायला सुरुवात करूया म्हणजे आपल्याला हळूहळू त्यातल्या गमतीजमती समजत जातील.’’ असं म्हणत मामाने खेळाची सगळी मांडामांडी केली. आजी, आई, बाबा एकेकटे आणि सात्विका व आजोबा एका टीममध्ये आणि मामा बँकर, अशी खेळाला सुरुवात झाली. खेळ सुरू असतानाच मामा सांगायला लागला, ‘‘फार पूर्वी म्हणजे १९०३ मध्ये अमेरिकेत एलिझाबेथ मॅगी फिलिप्स यांनी मोनोपॉली या खेळाची सुरुवात केली असं म्हणतात. हेन्री जॉर्जची सिंगल टॅक्स थिअरी लोकांना कळावी म्हणून या खेळाची एलिझाबेथने निर्मिती केली असं म्हटलं जातं. तेव्हा या खेळाला लँडलॉर्ड्स गेम असं म्हटलं जाई. नंतरच्या काळात एलिझाबेथच्या या संकल्पनेवर आधारित असलेले वेगवेगळे खेळ निर्माण झाले. आता तर हा खेळ जगातल्या अनेक देशांमध्ये आणि सदतीसपेक्षा जास्त भाषांमध्ये मिळतो!’’

मामाने आणलेला खेळ नीट समजून घेऊन खेळायला जमायला सगळ्यांना थोडा वेळ लागला, पण एकदा तो खेळायला जमल्यावर मात्र सगळ्यांना खूपच मजा आली. अचूक अंदाज, पैशांचं नियोजन, प्रॉपर्टी निर्माण करण्याचे निर्णय आणि एकाग्रता अशा सगळ्याच गोष्टींचा कस लावणारा हा खेळ अर्थशास्त्र आवडणाऱ्या सात्विकाला खूपच आवडला हे वेगळं सांगायला नकोच!

अंजली कुलकर्णी-शेवडे anjalicoolkarni@gmail.com