जानेवारी महिना, पतंग भरारा
तिळगुळ लाडु, गोड-गोड बोला

फेब्रुवारी थंडी, हुहुहीही-
चांदोबाने घातली ढगांची बंडी

मार्च एप्रिल, छमछम छडी
परीक्षेची लगबग, अभ्यासाची घाई

मेचा तडका, आंब्याची पेटी
कैरी कमाल, सुट्टी धम्माल

जून-जुलै, गार-गार वारा
शाळेची घाई, पावसाच्या धारा

आषाढाचा ढोल ढमढम वाजे
श्रावणाच्या ऊनात नागोबा डुले

सप्टेंबर येता, आले बाप्पा
मटमट मोदक, आरतीचा दणका

ऑक्टोबर हसरा, आनंदी दसरा
धाधिन् टिपऱ्या, गरब्याचा फेरा

लखलख, चकमक ही कोण आली?
लाडू, करंजी, दणदण दिवाळी

नोव्हेंबरने आणला डिसेंबरला केक
हॅपी ख्रिसमस, न्यू ईयर भेट