बालमित्रांनो, आपण सध्या उन्हाळ्याच्या सुटय़ा अनुभवत असाल. स्वच्छंदीपणे मनमुराद भटकणे, किल्ल्यांवर जाणे, रानातल्या झाडांवरून कैऱ्या, करवंदं, जांभळं अशा प्रकारची फळे स्वत: झाडावरून काढून आणून त्याचा आस्वाद घेणे अशा नाना प्रकारे आपण सुट्टीचा आनंद घेत असाल. परंतु हे करताना आपण bal06निसर्गात असलेल्या किती तरी छोटय़ा छोटय़ा गोष्टींकडे बघायचे विसरूनच जातो. याचे कारण अगदी साधे आहे. कारण आम्ही समोर दिसणाऱ्या गोष्टींचा अर्थ लावण्याचा किंवा त्यासंबंधी प्रश्न विचारण्याचा विचारच करीत नाही. अर्थात, तुम्ही जर एकदा तरी असा प्रयोग करून पाहिलात, तर मात्र यातून तुम्हाला बरेच काही शिकायलाही मिळेल व त्याचबरोबर नवनवीन गोष्टी अनुभवण्यास मिळतील. म्हणूनच अशाच काही वेगळ्या बाबी आज आपण बघूयात.
आपण खेळता खेळता कुठे तरी पडतो आणि जखम झाल्यास ती दाबून धरतो. तुमचे आई-बाबा लगेच त्यावर औषध लावतात व आपल्याला पटवून देतात की आता जखम बरी होईल. दोन-तीन दिवसांत आपल्याला त्याचा अनुभवही येतो. आपल्या जखमेतील रक्त थांबलेले असते. जखमेच्या जागी खपली आलेली असते व त्याचा रंगही बदललेला असतो. पुढे ती खपलीही पडून जाते व आपली त्वचा पुन्हा पहिल्यासारखी होऊन जाते.
आता विचार करा, हे सर्व करायला आपल्याला हात-पाय दिलेले आहेत. आपली अडचण आपण आई-बाबांना सांगू शकतो. काहीही झाले तरी आपण वेगवेगळे उपचार घेऊ शकतो; परंतु अशीच जखम जर एखाद्या झाडाला झाली तर ते काय करेल हो? त्याच्याकडे उपचारासाठी तर आपल्यासारखी काहीच साधने उपलब्ध नाहीत. तेव्हा आपल्या मनात खरंच प्रश्न उभा राहतो. पण आपल्यापकी किती जणांच्या मनात आजवर bal03जखमी झालेले झाड पाहिले की असा प्रश्न निर्माण झाला आहे? आपण नेहमीच रानातल्या झाडावरच्या कैऱ्या काढायच्या असतील तर खालूनच दगड मारतो व ती कैरी पडेपर्यंत हा खेळ चालू असतो. शेवटी एकदाची कैरी पडते व आपण चालू लागतो; पण हे सर्व होत असताना झाडांना मात्र अनेक ठिकाणी आपण मारलेल्या दगडांमुळे खरचटले जाते. आपण त्याकडे कधी पाहातच नाही. खरे सांगायचे तर, अशा किरकोळ जखमांमुळे झाडाचे फार काही नुकसान होत नाही. पण ते नुकसान टाळण्यासाठी झाडांनी केलेले प्रयत्न आपण समजून घेतले पाहिजे. आपल्यापकी अनेक जणांनी झाडांच्या खोडावरून िडक ओघळताना पाहिले असेल. किंवा काही वेळेस अगदी िडकच ओघळतो असे नाही, तर काळसर रंगाचे डाग खोडावर पडलेले दिसतात. काही वेळेस खोडावर छोटय़ा किंवा काही झाडांच्या खोडावर मोठय़ा गाठी तयार झाल्याचे पाहिले असेल. या सगळ्या गोष्टींकडे पाहताना आपण सहज म्हणून जातो की,या झाडांवर रोग पडलाय व त्याकडे दुर्लक्ष करतो. वास्तविक पाहता या गोष्टीच झाडांकडे असलेली प्रबळ शस्त्रे असतात. फक्त आपल्याला ती जाणवत नसल्याने त्याचं महत्त्व आपल्या लक्षातच येत नाही.
सर्वसाधारणपणे सगळ्याच झाडांमध्ये महत्त्वाचे वैशिष्टय़ असते ती त्या झाडाच्या संरक्षण क्षमतेची साधने. यासाठी झाडांची भिस्त असते ती त्यांच्या बाह्य भागातील विविध पेशींच्या उभ्या असलेल्या िभती. निसर्गात झाडाझुडपांवर चरणारे जीव सोडले तर अन्य सर्व जीव अत्यंत सूक्ष्म असे असतात व ते झाडांच्या आतमध्ये शिरण्याचा नेहमी प्रयत्न करतात. यामध्ये सूक्ष्म जीव, जिवाणू, विषाणू, अगदी छोटे किडे, बुरशी प्रकारातील प्रजाती इत्यादी जीवांचा समावेश असतो. या जीवांना झाडांच्या आतल्या भागात शिरण्याकरिता खूपच संघर्ष करावा लागतो. कारण प्रत्येक झाडाचे स्वत:चे असे वैशिष्टय़ असते, त्यामुळे त्यांना सहजासहजी झाडांच्या आतमध्ये प्रवेश मिळत नाही. झाडाला कोणतीही इजा झाली नसल्यास असा प्रवेश मिळणे फारच कठीण असते. कारण या झाडांचे सर्वात बाहेरील बाजूच्या पेशींच्या भित्तिका असतात त्या फारच टणक व कडक असतात. त्यामुळे बाहेरील सूक्ष्म जीव अशा पद्धbal04तीने झाडात प्रवेश करूच शकत नाही. जेव्हा कधी झाडाला कोणत्याही भागात इजा होते; तेव्हा मात्र या अभेद्य पेशिकांच्या िभती तुटतात व बाहेरील जीवांना आतमध्ये प्रवेश करण्यास नामी संधी चालून येते. या वेळी मात्र जणू काही हातघाईची लढाई चालावी त्याप्रमाणे इथे संघर्ष होत असतो. बाहेरील पेशिभित्तिकांचे संरक्षक कवच पडलेले लक्षात येताच अन्य बाबी अवलंबिल्या जातात व तात्काळ वेगवेगळ्या रसायनांची निर्मिती अत्यंत वेगाने सुरू होते. झाडाच्या संरक्षण िभतीस पडलेले भगदाड बुजण्यासाठी किमान काही दिवस लागतात, तोपर्यंत या भागातून कोणत्याही प्रकारची कीड झाडामध्ये शिरू नये म्हणून झाडाने केलेली रसायने ही या जखमेच्या भागात आणली जातात. झाडांच्या खोडावर तयार होणारा िडक हा खरे तर याच प्रक्रियेचा भाग आहे. म्हणूनच आपण या विषयातील अजून माहिती घेण्यापूर्वी आपल्या भागातील झाडांचे सर्वेक्षण करूयात व किती झाडांमध्ये नेहमीपेक्षा वेगळ्या गोष्टी दिसतात याचे टिपण तयार करूयात. हे करताना झाडांना जेथे जखम झालेली आहे त्या भागाचे जास्तीत जास्त निरीक्षण आपल्याला करावयाचे आहे. तेव्हा पुढील भागात उर्वरित माहिती घेऊ या. तोपर्यंत मला आपण गोळा केलेली माहिती माझ्या ई-मेलवर जरूर पाठवा.
-डॉ. राहुल मुंगीकर