साहित्य : चंदेरी कागदी प्लेट, रंगीत कागद, पेन्सिलचा गोल लगदा, रंगीत कागद, सॅटिन पट्टी, पंच मशीन, पेन्सिल, कात्री, गुंजाच्या बिया किंवा टिकल्या, गम, इ.
lok05कृती : चंदेरी कागदी प्लेटला एका बाजूस पेन्सिलने चंद्रकोर काढा. कात्रीने अर्धगोलात कापून घ्या. रंगीत कागदाच्या साधारण अडीच इंचाच्या लांब गुंडाळ्या करून घ्या. डिझाइनप्रमाणे किती बसतात तसे ठरवा. ( मोठी प्लेट असल्यास जास्त बनवाव्या लागतील) त्याचप्रकारे लहान गुंडाळ्या, पेन्सिलची टोक काढताना जमलेला लगदा, गुंजाच्या बिया किंवा टिकल्यांनी सुशोभित करा. दोन्ही बाजूंच्या कोपऱ्यावर पंचने छिद्रे पाडा. आपल्याला हव्या त्या मापाने सॅटिनची पट्टी त्या छिद्रामध्ये गाठ मागे जाईल अशा पद्धतीने जोडा. असे कागदी नेकलेस तुम्ही तयार करू शकता. lr22