साहित्य : केशरी, हिरवा, पांढरा या रंगांचे कार्डपेपर, कात्री, फुटपट्टी, गम, स्केचपेन, पेन्सिल, कंपास इत्यादी हस्तकलेचे साहित्य.
कृती : येत्या ८ मार्चच्या निमित्ताने महिला सक्षमीकरण वा मुली वाचवा या अशयाचे शपथ कार्ड तयार करू या.
पांढऱ्या कागदावर १५ सें.मी. बाय  पाच सें.मी.चा आयत काढून घ्या. ५ सें.मी बाय ५ सें.मी.चे तीन चौकोन तयार होतील. डाव्या व उजव्या चौकोनाचा काटकोनाने मध्य काढा आणि वरील व खालील बाजूस साधारण २ बाय २ सें.मी.ची पट्टी सोडा व आतील चौकोन कात्रीने आकृतीप्रमाणे कापा. अशाच पद्धतीने उजवीकडे विरुद्ध बाजूस कापून घ्या. वरील पट्टय़ांना केशरी कागद व खालील बाजूस हिरव्या पट्टय़ा चिकटवा. दोन्ही बाजूस पट्टय़ा उघडणारे चौकोनी शपथ कार्ड करण्यास मध्यावर गोलात महिलेचे वा मुलीचे प्रतीकात्मक चित्र काढा. निळ्या रंगात शपथ ठळक अक्षरांत लिहा.  
   muktakalanubhuti@gmail.com