News Flash

आर्ट कॉर्नर : नाताळचे शुभेच्छाझाड

हिरव्या रंगाचे कागद सम आकारात चौकोनी कापून घ्या. आकृतीत दाखविल्याप्रमाणे पाने बनवा.

झाड आपल्या शोकेसची शोभा वाढवेल किंवा नातेवाईकांना भेट देण्यास वापरता येईल.

साहित्य : हिरव्या रंगाचे कागदाचे तुकडे, चॉकलेटचे कागद, क्रेयॉन्स, कात्री, गम, लाल व (चॉकलेटी) विटकरी रंगाचे तुकडे, स्केचपेन, इ.
कृती : हिरव्या रंगाचे कागद सम आकारात चौकोनी कापून घ्या. आकृतीत दाखविल्याप्रमाणे पाने बनवा. चॉकलेटचे चमचम कागद लहान असतील तर त्याचे तुकडे लहान होणार. परिणामी पानेसुद्धा लहान होणार. विटकरी रंगाच्या कागदाची जाड गुंडाळी झाडाचा बुंधा म्हणून चिकटवा. लाल रंगाचे छोटे-छोटे चौकोन झाडावर गिफ्ट्स म्हणून चिकटवायचे आहेत. आता लहान-मोठी पाने मोठय़ा त्रिकोणी झाडाच्या आकारात बुंध्याच्या वर चिकटवत जा. सर्व पाने न चिकटवता मागील बाजूस अगदी थोडासा गम लावा. जेणेकरून घनदाट झाडाचा
दृश्य परिणाम साधता येईल. हे झाड आपल्या शोकेसची शोभा वाढवेल किंवा नातेवाईकांना भेट देण्यास
वापरता येईल.
अर्चना जोशी – muktakalanubhuti@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 20, 2015 1:01 am

Web Title: paper christmas trees
Next Stories
1 डोकॅलिटी :
2 देवाचा शिक्का
3 गणिती शब्दकोशांचा खजिना
Just Now!
X