साहित्य : टिंटेड पेपर – हिरवा, निळा, गडद हिरवा, कात्री, गम, टिकल्या.
कृती : साधारण १५ सेमी ७ १५ सेमी आकारात निळा चौरस कागद कापून घ्या. आकृतीत दाखविल्याप्रमाणे दुमडी करून मोर तयार करा. पिसाऱ्यासाठी साधारण मोराच्या पिसाऱ्याच्या मागील चौकोनाच्या आतील आकारात निमुळत्या टोकाचे अर्धगोल हिरव्या रंगात कापा. दुसरा अर्धगोल त्यापेक्षा लहान आकारात कापा. कात्रीने अर्धगोलावर छोटय़ा-छोटय़ा अंतरावर कापून घ्या. (स्लिट कट्स) प्रत्येक कापाच्या टोकावर छोटय़ा-छोटय़ा टिकल्या चिकटवून घ्या. गडद व फिक्या रंगाचे भान ठेवून भिन्न रंगात उठावदार दिसतील अशा सुशोभित करा. चोचीच्या आकाराच्या प्रमाणात एक दुहेरी समआकार त्रिकोण बनवा व चोचीमध्ये दोन्ही बाजूंनी एक-एक टोक अडकवा. तुरा आपोआप तयार झाला. त्यालाही हिरव्या रंगाच्या टिकल्या लावून सुशोभित करून घ्या.