अंधाऱ्या खोलीत
उंदरांची सभा
मधोमध उभा
नेता नवा
काढा मनातून
बोकोबाची भीती
बदलावी नीती
जगण्याची
बोक्याच्या गळ्यात
बांधू एक घंटा
मिटवू या तंटा
कायमचा
उंदीर म्हातारा
बोलला हसून
तूच ये बांधून
घंटा त्याला
इतक्यात आले
कानावर म्यांव
सर्व घेती धाव
बिळाकडे
बोबडी वळली
अंगा फुटे घाम
नाही म्हणे राम
नेतेपदी
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 2, 2013 12:20 pm
Web Title: poem