दिवाळीच्या फराळाचीस्पर्धा इथे सुरू आहेसांगे एकेक पदार्थमीच कसा मस्त आहे!गरीगरीत मी ‘लाडू’किती गोंडस नि गोलगोड गोड चव माझीतिचे वेगळेच मोल‘करंजी’ मी आहे बाईदिवाळीची खरी शानमाझा कातीव आकारशोभे मज किती छान!कुरकुरीत चविष्टसांगा बरे कोण आहे?तुम्हा साऱ्यांची लाडकीहोय मी ती ‘शेव’ आहे!काटेरी, खमंग गुणी‘चकली’ हे माझे नावसाऱ्यांपेक्षा मिळे मलाअधिकच इथे भाव!‘चिवडा’, ‘शंकरपाळी’तेही मागे न राहिलेआम्हावाचून दिवाळीनाही होणार म्हणले!असा फराळ स्वादिष्ट धावे त्याच्याकडे मननको थांबाया दोस्तांनो,आला दिवाळीचा सण!