News Flash

अभ्यास करू कसा?

आई अभ्यास करू कसा? जरा सांग तरी मला..

आई अभ्यास करू कसा?
जरा सांग तरी मला..

बाहेर चालूये मस्ती
दंगा सगळे करिती
गृहपाठ करू कसा?
जरा सांग तरी मला
आई..

गार गार थंडी किती
बघ बोटे आखडली
हाती पेन धरू कसा?
जरा सांग तरी मला
आई..

फॅन फिरे गरागरा
पाने उडती भराभरा
किती वेळ झेलू वारा?
जरा सांग तरी मला
आई..

पाऊस पडतो टपटप
होडी धावे झपझप
कसे आवरू मन सैरावैरा?
जरा सांग तरी मला
आई..

चार्ली मज आठवतो
डोळ्यांपुढे मिकी येतो
वाचन मी करू कसा?
जरा सांग तरी मला
आई..

– बालाजी मदन इंगळे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2016 1:03 am

Web Title: poem for kids 3
टॅग : Kids,Poem
Next Stories
1 आर्ट कॉर्नर : गोष्ट डबी
2 ऑफ बिट : ए, ऐक ना!
3 अतिथी देवो भव!
Just Now!
X