आनंदी आनंद असे हो
पिवळे तांबूस ऊन पडे
फुलाफुलांतून वाहे वारा
सुगंधातली धून गडे

बागडणारे फुलपाखरू
झुडपावरले मीच गडे
कधी उन्हावर भिरभिरणारे
कधी फुलामधी जाय गडे

रंग मनोहर पंख मुलायम
नक्षी तऱ्हेची किती गडे
निळे जांभळे हे बघ पिवळे
फुले नाचुनी म्हणती गडे

धावत येती माझ्या मागून
मी न सापडे तया गडे
दुरून पाहती डोळेभरूनी
तीच लेकरे शहाणी गडे
– अंजली सावले