28 February 2021

News Flash

एकदा काय झाले..

एकदा मी फुलपाखरू  झाले

एकदा मी फुलपाखरू  झाले

पाना-फुलांवर फिरून आले

 

मला आवडे ते भिरभिरणे

फुलांमधील मकरंद चाखणे

 

झाडावेलींशी दोस्ती झाली

गप्पांची मैफल रंगली

 

गृहपाठाची कटकट नाही

पाठांतराची वटवट नाही

 

रागवत नाही येथे कुणावरी

बागडण्यात आहे मजाच न्यारी

 

हिरवे डोंगर, रान डोलते

आनंदाची बाग ही फुलते

 

खरंच मी फुलपाखरू झाले

हिरवा निसर्ग पाहून आले

– एकनाथ आव्हाड

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 17, 2021 2:55 am

Web Title: poem for kids dd70
Next Stories
1 ऑनलाइन शाळा
2 गोड गोड बोला..पण मास्क लावून!
3 हेही दिवस जातील..
Just Now!
X