काव्यमैफलनिळ्याभोर तळ्यात निळे निळे पाणीपाण्यावर लाटांच्या छान छान गाणी ।।बेडुकराव काठावर ऐटीत बसतातपाण्याच्या लाटांवर एक झोप काढतातघोरण्याचा आवाज त्यांचा घुमतो कानीपाण्यावर लाटांच्या छान छान गाणी ।।इवलिशी चिमणी नाहायला येतेगवताच्या काडीवर टॉवेल टाकतेकेसातून पडते तिच्या टप्टप् पाणीपाण्यावर लाटांच्या छान छान गाणी ।।झुकलेल्या फांदीवर खारुताई बसतेपाण्याच्या आरशात गंध-पावडर करतेदिवसभर करते ती वेणी आणि फणीपाण्यावर लाटांच्या छान छान गाणी ।।एक मुंगी धुणं घेऊन धुवायला आलीसाबणाची वडी तिची पाण्यातच गेलीऐकत नाही रडणे तिचे मुळुमुळु कोणीपाण्यावर लाटांच्या छान छान गाणी ।। बालाजी मदन इंगळे