19 April 2019

News Flash

पक्षी होऊन..

नारळाच्या झाडावर, उंच उंच जाऊ, चमकत्या चांदण्या, हळुचकन पाहू

नारळाच्या झाडावर, उंच उंच जाऊ

चमकत्या चांदण्या, हळुचकन पाहू

वाऱ्यावर झुलत उडत उडत जाऊ

आभाळाला पट्कन हात लावून येऊ

झाडाच्या शेंडय़ावर फिरत राहू

झुलत्या फांदीवर हिंदोळे घेऊ

गोड गोड फळे पोटभर खाऊ

साऱ्यांना टुक टुक करीत राहू

पक्षी झालो तर बोलणार कसं?

आईबाबांना कळणार कसं?

आई नि बाबा घाबरून जातील

सगळीकडे मला शोधत बसतील

नको रे बाबा, हे पक्षी होणं

आईचा ‘सोन्या’ असणंच बरं!

– शकुंतला मुळ्ये

 

छत्री

एकदा छत्रीच्या मनात आले

आपणच का नेहमी ओले ओले?

माणसं आपल्या छपराखाली राहतात

आपल्याला मात्र भिजवून टाकतात

स्वत: छानपैकी घरात राहतात

मला सरळ चपलांजवळ टाकतात!

गरज पडली की बकोट धरतात

गरज संपली की अडगळीत टाकतात!

कधी कधी वाटतं, जिरवावी खोड

एकेक काडीला म्हणते ‘मोड!’

पक्के लबाड दुरुस्त करतात!

पुन्हा मला कामाला जुंपतात!

– नीरज प्रसन्न धर्माधिकारी

First Published on August 18, 2018 1:21 am

Web Title: poetry for children