मुंगीताई मुंगीताई
कुठे जातेस घाई घाई?
स्वत:मधेच असते दंग
जरा कुठे बघत नाही
साखर कुठे सांडल्याची
मिळालीय का खबर?
की गुळाचा खडा दिसल्याची
बातमी आलीय कानावर?
कामाची तर तुला
भारी आवड बाई
मुंगीताई मुंगीताई
कुठे जातेस घाई घाई?
खाऊ कुठे ठेवला आहे
कसे गं तुला अचूक कळते?
चालता चालता मैत्रीण तुझी
हेच का कानात सांगते?
रांगेत चालण्याची शिस्त तू
कधीच मोडत नाही
मुंगीताई मुंगीताई
कुठे जातेस घाई घाई?
– अनुजा तातावार

उन्हाळय़ाची सुट्टी

आता लागली
उन्हाळय़ाची सुट्टी
आनंदी आनंद
अभ्यासाशी कट्टी॥

फिरायचे आता
खूप दूर दूर
कधी मुंबई-ठाणे
तर कधी नागपूर</p>

बघत बसायचा
कधी घरी टीव्ही,
तर कधी खेळायचे
क्रिकेट आणि कबड्डी॥

उन्हाळय़ाची सुट्टी
भुर्रकन् उडणार
शाळेची कटकट
पुन्हा मागे लागणार॥

वाटते, उन्हाळा असावा
सहा महिन्यांचा
नसणार मग
सुट्टय़ांचा तोटा॥
– वसंत खेडेकर

bal04