X
निवडणूक निकाल २०१७

छूमंतर

एकदा मोठी गंमत झाली, जादूगाराने जादू केली          

एकदा मोठी गंमत झाली

जादूगाराने जादू केली

जादूने मी हादरून गेलो

गुडघ्याएवढा बुटका झालो

रस्त्यात भेटली शाळेतली मुलं

म्हणाली, बघा आलंय खुळं

खो-खो सारखी हसत सुटली

म्हणाली, याची पाटी फुटली

घरी आलो मी रडत रडत

कडी वाजवली उडय़ा मारत

आई म्हणाली, ‘काय झालं?’

तिलाही पटकन् रडूच आलं

तिनं घेतलं मला जवळ

जादूने लगेच काढला पळ

 

एकनाथ आव्हाड

Outbrain