बालमित्रांनो, आज आहे विजयादशमी, अर्थात दसरा. पाटीवर आकडय़ांची सरस्वतीदेवी काढून शिक्षणाचा श्रीगणेशा करण्याचा दिवस. तिचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तिचे स्तवन, पूजन करण्याचा दिवस.
समर्थ रामदास गणेशापाठोपाठ ‘‘नमूं शारदा मूळ चत्वार वाचा’’ असे म्हणून तिला वंदन करतात. संत तुकाराम तिला ‘माऊली सारजा’ म्हणतात. तर संत ज्ञानेश्वरांनी तिचा उल्लेख ‘वाग्विलासिनी’ असा केला आहे. विद्या, कला यांची अधिष्ठात्री असलेली सरस्वती ही भारती, गायत्री, वाणी, बह्मी, विशाला, हंसवाहिनी, मेधा, ज्ञानदा, विश्वमोहिनी, वेदमाता, वरदायिनी अशा अनेक नावांनी गौरविली जाते.
देवी सरस्वतीच्या काही प्रार्थना, श्लोक खाली नमुन्यादाखल देत आहे. त्यापासून प्रेरणा घेऊन सरस्वतीला प्रसन्न करण्यासाठी अभ्यासाचा संकल्प करून तो सिद्धीस न्या. हीच सरस्वतीची खरी पूजा आहे. ती प्रसन्न होऊन तुम्हाला ‘यशस्वी भव’ असा वर नक्कीच देईल.

नमस्ते शारदे देवि वीणापुस्तकधारिणि ।

Ram Divya ABhishek
Ram Navami : प्रभू रामाच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक! अयोध्येतल्या मंदिरातील रामलल्लाचं मूळ रुप दर्शन
Why did Lawrence Bishnoi gang fire outside Salman Khans house What is the extent of this gang
लॉरेन्स बिष्णोई टोळीने सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार का केला? या टोळीची व्याप्ती किती? पुन्हा हल्ला करण्याची धमकी किती गंभीर?
Nashik, Fraud, developing place,
नाशिक : जागा विकसित करण्याच्या बहाण्याने फसवणूक, सात जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
Sharad Pawars appeal to the youth to question to government regarding jobs and employment
आश्वासन वर्षाला दोन कोटी रोजगारांचे, प्रत्यक्षात नऊ वर्षांत सात लाखच नोकऱ्या; सरकारला जाब विचारण्याचे शरद पवार यांचे तरुणाईला आवाहन

विद्यारम्भं करिष्यामि प्रसन्ना भव सर्वदा ।।

कराग्रे वसते लक्ष्मी: करमध्ये सरस्वती।

करमूले तु गोविन्द: प्रभाते कर दर्शनम् ।।

या कुंदेंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।

या वीणावरदण्डमंडितकरा या श्व्ोतपद्मासना ।।

या ब्रह्माच्युतशंकरप्रभ्रृतिभिर्देवै: सदा वन्दिता ।

सा मां पातु सरस्वती भगवती नि:शेषजाडय़ापहा ।

या चला शारदेला वंदुया तिजला

बसली हाती घेऊनी पोथी का शिकवायाला

वंदुया तिजला ।

शोभे हाती माळ पहा ती मणि मोजायाला ।

वंदुया तिजला।

वाजवी वीणा जरि करमेना रमवाया बाला ।

वंदुया तिजला ।

ल्ल ज्योत्स्ना सुतवणी