बालमित्रांनो, आज आपण ‘र्व’ या जोडाक्षराचा आपल्या खेळात उपयोग करणार आहोत. येथे शब्दातील ‘र्व’ या अक्षराचे स्थान दर्शवले आहे. शब्द अर्थपूर्ण होण्यासाठी आवश्यकतेनुसार ‘र्व’ या अक्षराला काना, मात्रा, वेलांटी, अनुस्वार इत्यादी तुम्ही देऊ शकता. उदाहरणार्थ- निर्वात, निर्वविाद इत्यादी. अशा प्रकारे तुम्हाला खालील सूचक अर्थावरून ‘र्व’ युक्त शब्द ओळखायचे आहेत. आवडेल का तुम्हाला हे शब्द शोधायला?

१)    याचे घर नेहमीच खाली असते.
र्व

२)    फार दिवसांनी येणारी संधी, शुभकाल
र्व

३)    ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, —वेद हे भारतीय संस्कृतीतील चार महत्त्वाचे वेद.
र्व

४)    उंच डोंगर
र्व
        
५)    गणेश वासुदेव जोशी हे — काका या नावाने प्रसिद्ध होते.
र्व
    
६)    हल्लीच्या काळाचा, प्राचीनच्या विरुद्ध
र्व
            
७)    गंजलेल्या वस्तूंनी जखम झाल्यास—याचे इंजेक्शन घ्यावे लागते.
र्व

८)    संस्कृत भाषा
र्व

९)    व्यर्थ काथ्याकूट
र्व
    
१०)    सुरळीतपणे, अडथळा न येता
र्व

११) संगीतातील एक राग.
र्व    

१२)    पाहणी
र्व    
        
१३)    अत्युत्तम
र्व
            
१४)    आरंभापासून अखेपर्यंत, पुढील व मागील
र्व