मी एक सुपर हिरो, बनवतो शत्रूला झिरो
माझ्यात सुपर शक्ती, कुंठित होईल तुमची मती
सरसर भिंतीवर चढतो, जाळं घेऊन फिरतो
माझी जखम आपोआप बरी होते.
माझी छबी फक्त पुस्तकात अन् सिनेमात दिसते.
पण मला बघताच सर्वाना आनंदाची भरती येते
(स्पायडरमॅन)

Untitled-13

farmer suicide, documentry farmer suicide
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: अचंबित करणाऱ्या गोष्टी…
health benefits of fenugreek seeds
तुम्ही १४ दिवस मेथीचे दाणे खाल्ले तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? डॉक्टरांकडून जाणून घ्या…
Kitchen jugad video wash clothes with green chilli apply on cloth
Kitchen Jugaad Video: साबणाऐवजी हिरव्या मिरचीने धुवा कपडे; विचित्र उपायाचा चमत्कारिक परिणाम
Nutritious but tasty Makhana Uttapam Try this recipe once
पौष्टिक पण चविष्ट असा मखाना उत्तपा! एकदा खाऊन तर पाहा, ही घ्या रेसिपी

आकार माझा वेगवेगळा
अंगी माझ्या नाना कळा
तिन्हीसांजेला माझी आठवण
माझ्यामुळे प्रकाशाची साठवण
महाल वा झोपडी शोभून दिसतो.
मी नसलो तर तिमिर असतो.
(दिवा)

Untitled-15

टणक कवचाच्या आत दडलेले
हिरवटसर रंगाची लांबटसर बी
सर्व पोषकतत्त्व असलेला
हृदयाला बलतत्त्व देणारा
मिष्टान्नात हमखास टाकले जाणारा
मी एक सुकामेवा
(पिस्ते)

Untitled-14

हरणाची मी एक बहुपयोगी जात
माझे दुसरे नाव केरिबू
गाडी ओढतो बर्फावर
शिंग आहे डोक्यावर
आता घेऊन येईल मी झडकरी
नाताळबाबांना तुमच्या घरी
(रेनडीअर)

 

Untitled-16

ऋत्विज टोळे, सुविद्यालय, वझिरा नाका, बोरीवली.

Untitled-17

वरद देशमुख,
लायन्स इंग्लिश स्कूल, सिल्व्हासा.