12 December 2017

News Flash

चिंब पाऊस

चिंब चिंब भिजू, पावसात छान नाचू

लीला शिंदे | Updated: September 24, 2017 12:53 AM

चिंब चिंब भिजू

पावसात छान नाचू

गोल गोल गिरकी घेत

पाऊसधारा वेचू

चिक चिक चिखलात

सर सर घसरत

नाचत डोलत खेळू

मस्त मजेदार कसरत

साचलं पाण्याचं तळं

छप छप मारु उडय़ा

पाणी पळे खळखळ

पावसाच्या अवखळ खोडय़ा

झाडाच्या पानाआड

चिंब भिजली मैनाराणी

पावसाच्या सरसर धारा

झाड गातं पाऊसगाणी

पावसा पावसा रोज ये

मोठ्ठं तळं साचू दे

चिक चिक चिखल होऊ दे

मस्त मनसोक्त खेळू दे

 

लीला शिंदे

First Published on September 24, 2017 12:53 am

Web Title: rain poem in marathi