पावसाळ्यात आपल्याला आकाशात इंद्रधनुष्य दिसत. पण तेच इंद्रधनुष्य आपल्याला कागदावर उमटवता आले तर..! चला, करू या आज हीच गंमत!

साहित्य : एक वाडगा, पाणी, नेलपॉलिश, काळा कागद.

summer vacation at home
उन्हाळ्याच्या सुट्टीतलं घर
ditch that glass of ice cold water during summer
उन्हाळ्यात थंडगार बर्फाचे पाणी पीत आहात? आजचं सोडा ही वाईट सवय, तज्ज्ञांनी सांगितले कारण…
Loksatta chaturang Think rationally disbelief restless
इतिश्री: भावनेवर तर्कशुद्ध मात!
Martand Sun Temple, Kashmir
विश्लेषण: काश्मीरमधील १६०० वर्षे जुने मार्तंड सूर्यमंदिर उद्ध्वस्त करणारा ‘तो’ परकीय आक्रमक कोण?

कृती : पाण्याने वाडगा अर्धा भरून घ्या. त्यात नेलपॉलिशचा एक थेंब टाकून थोडा वेळ वाट पाहा. नेलपॉलिश हळूहळू पाण्याच्या पृष्ठभागावर पसरेल. नेलपॉलिश पाण्यावर पूर्णपणे पसरल्यावर काळ्या कागदाचा एक तुकडा घेऊन तो त्या पाण्यात बुडवून बाहेर काढा. कागदाचा तो तुकडा सूर्यप्रकाशात धरून वेगवेगळ्या कोनातून पाहा. कागदाच्या पृष्ठभागावर इंद्रधनुष्यातले सप्तरंग दिसतील.

वेगवेगळ्या रंगांचे कागद आणि वेगवेगळ्या रंगांचे नेलपॉलिश वापरून हाच प्रयोग पुन्हा करा. दिसणाऱ्या रंगांमध्ये किंवा त्यांच्या तेजस्वीपणात काही फरक आढळतो का, त्याची नोंद करा.

तुमच्या प्रयोगातल्या गमती आम्हाला जरूर कळवा.

वैज्ञानिक तत्त्व : पाण्यात काळा कागद बुडवल्याने त्याच्या पृष्ठभागावर नेलपॉलिशचा अतिशय पातळ असा थर जमा होतो. या थराच्या वरच्या पृष्ठभागाकडून सूर्यप्रकाशाचा काही भाग परावर्तित होतो आणि  प्रकाशाचा काही भाग थराच्या आतल्या दिशेने जातो. आत गेलेल्या प्रकाशाचा भाग हा नेलपॉलिशच्या खालच्या थराकडून परावर्तित होतो. वरच्या आणि खालच्या पृष्ठभागाकडून परावर्तित झालेले प्रकाशतरंग एकत्र आल्याने त्यांच्यात व्यत्यय निर्माण होऊन आपल्याला पृष्ठभागावर वेगवेगळे रंग दिसतात.
वेगवेगळ्या रंगांच्या प्रकाशतरंगांची तरंगलांबी वेगवेगळी असते. त्यामुळे आपल्या पाहण्याच्या कोनानुसार आपल्याला थराच्या वेगवेगळ्या भागांकडून येणाऱ्या प्रकाशाचा रंग वेगवेगळा दिसतो.कागदाच्या काळ्या रंगामुळे सप्तरंग अधिक स्पष्टपणे उठून दिसतात. पावसाळ्यात रस्त्यातल्या खड्डय़ात साचलेल्या पाण्यावर पडलेल्या पेट्रोलच्या पातळ थरामुळेही असेच इंद्रधनुष्य दिसते.