साहित्य : जुन्या रिकाम्या रिफिल्स (अ‍ॅडजेल पेनाच्या), जुन्या खराब सिडीज् (कमीत कमी २), सीताफळ, गुंजाच्या बिया, पिस्त्याची टरफले, गम, अ‍ॅक्रॅलिक सोनेरी रंग, बारीक ब्रश इ.
कृती : जुन्या सिडीच्या कागदी बाजूवर गमने गोलाकार (चक्राकार) रेषेत रिफिल्स चिकटवा. दुसऱ्या सिडीच्या चमचमत्या बाजूवर पिस्त्याची साले व सीताफळ, गुंजाच्या बियांचे सुशोभन करून व्यवस्थितपणे चिकटवा व वाळू द्या. वाळल्यावर बारीक ब्रशने पिस्त्याची साले अ‍ॅकॅ्रलिक सोनेरी रंगात रंगवा व पुन्हा वाळू द्या. सुशोभन केलेली सिडी रिफिल्स लावलेल्या सिडीवर चिकटवा व पुन्हा पूर्णपणे वाळू द्या. हे रिसायकल वॉलसर्कल तुमच्या भिंतीवरील चुकेवर अलगद बसेल व भिंतीची शोभा वाढवण्यास मदत करेल.