पाठय़पुस्तकातील अभ्यास हा तसा थोडासा कंटाळवाणाच विषय! आणि विज्ञानासारखा विषय. त्यातील समीकरणे, सूत्रे यामुळे क्लिष्ट वाटण्याची शक्यता जास्तच. खरे तर पुस्तकात वैज्ञानिक प्रयोगांचादेखील समावेश असतो. परंतु हे प्रयोग नुसते वाचून कळणे कठीण होते. कारण त्यांची तुम्हाला केवळ कल्पनाच करावी लागते. प्रयोगशाळेत त्याचे प्रात्यक्षिक बघितले तर त्या प्रयोगाचे आकलन अगदी सहजपणे होते आणि विज्ञान मनोरंजक वाटू लागते. परंतु हे प्रयोग प्रत्यक्ष दाखवणे हे शिक्षकांना नेहमीच शक्य असते असे नाही. मग यावर उपाय काय?
पुण्यातील ज्ञानप्रबोधिनीच्या एज्युकेशनल रिसोर्स सेंटरने तयार केलेल्या ँ३३स्र्://६६६.ी१ू-स्र्४ल्ली.१ॠ या साइटच्या माध्यमातून तुम्हाला हे प्रयोग सहजपणे बघता येतील. येथे शालेय विद्यार्थ्यांनी प्रयोगशाळेत केलेले बरेचसे प्रयोग बघण्यासाठी उपलब्ध केलेले आहेत. शास्त्रातील काही संकल्पना अ‍ॅनिमेटेड पद्धतीनेदेखील समजावून सांगितल्या आहेत. तसेच जिज्ञासा वाढवणाऱ्या काही प्रश्नांची तज्ज्ञांनी दिलेली उत्तरे यांचे व्हिडीओदेखील आहेत. या साइटवरील लिंक्स या भागात खास शालेय विद्यार्थ्यांसाठी बनवल्या गेलेल्या युटय़ूबवरील व्हिडिओंची सूची तुम्हाला दिसेल. तसेच इतरही अनेक लिंक्स दिलेल्या आहेत; ज्या तुमच्या ज्ञानात नक्कीच भर टाकतील.
या साइटचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे विविध विषयांच्या धडय़ातील प्रमुख मुद्दे सांगणारे स्लाइड शोज. उदाहरणार्थ, येथे तारे, आपली सूर्यमाला, अणूची संरचना, गतिविषयक नियम असे विषय घेऊन स्लाइड शोज बनवलेले आहेत. प्रत्येक स्लाइड शोमध्ये अंदाजे २० स्लाइडस आहेत. संबंधित विषयांची संपूर्ण माहिती या स्लाइडसमध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. ही माहिती अगदी मुद्देसूद पद्धतीने मांडलेली आहे. येथे उपलब्ध असलेले स्लाइड शोज हे मराठी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध आहेत. हे तुम्ही डाऊनलोडदेखील करून घेऊ शकता. परीक्षेसाठी तयारी करताना त्या धडय़ातील प्रमुख मुद्दे सांगणारे हे स्लाइड शोज खूप उपयोगी ठरतील. विद्यार्थी आणि शिक्षक यांना डोळ्यासमोर ठेवून तयार केलेली ही साइट तुम्हाला नक्कीच आवडेल.

manaliranade84@gmail.com

article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : पूर्वपरीक्षेच्या अभ्यासाचे नियोजन
Supreme Court ban Patanjali from advertising
अग्रलेख : बाबांची बनवेगिरी !
Razmanama Mahabharata in Persian language
महाभारत संस्कृतातून फारसीत; अकबराच्या साहित्यिक आविष्काराबद्दल तुम्हाला माहितेय का?
Science Day is Not just to celebrate but to practice it
विज्ञान दिन साजरा करण्यासाठी नव्हे, आचरणात आणण्यासाठी…